आयुष्याला मिळेल नवी दिशा! शिक्षक दिनी वाचा डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे प्रेरणादायी विचार..

Teachers Day History: आपल्या शिक्षकांप्रती आदर, प्रेम, कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे शिक्षक दिन. हा दिवस ५ सप्टेंबर रोजी भारतासह जगभरातील अनेक देशांमध्ये साजरा केला जातो. यूनेस्कोने देखील १९९४ मध्ये ५ सप्टेंबर हा दिवस जागतिक शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यासाठी मान्यता दिली. त्यामुळे या दिवसाचे महत्व निराळे आहे.

हा दिवस केवळ शिक्षक दिन नाही तर भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा हा जन्मदिन. त्यांचे शिक्षण क्षेत्रातील योगदान, देशकार्य आणि शेवटच्या श्वासापर्यंत निभावलेली आदर्श शिक्षकाची भूमिका, यामुळे त्यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून हा दिन आपण साजरा करतो. विशेष म्हणजे त्यांच्या हयातीतच त्यांच्या विद्यार्थ्यांनी हा दिवस साजरा केला आणि पुढे आजही आपण हा दिवस साजरा करत आहोत.

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे विचार हे देशाला दिशा देणारे होते. त्यांनी घडवलेल्या विद्यार्थ्यांनीही देशकार्यात मोलाचे योगदान दिले. त्यांचे विचार इतके प्रभावी आणि प्रेरणादायी होते की ते आजच्या पिढीलाच नव्हे तर पुढे कित्येक पिढ्यांना मार्गदर्शक ठरतील. तेव्हा आजच्या शिक्षक दिनी जाणून घेऊया डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे काही खास प्रेरणादायी विचार…

(वाचा: Teachers Day 2023: आज शिक्षक दिन! जाणून घ्या हा दिवस भारतात का आणि कशासाठी साजरा केला जातो..)

शिक्षक हा देश घडवू शकतो, तेवढे सामर्थ्य त्याच्यात असते. त्यामुळे त्याने सर्वाधिक बुद्धीमान असायला हवे.

ज्ञान आणि प्रेम दोन्ही आपल्याठायी असायला हवे कारण ज्ञानाने शक्ती मिळवता येते तर प्रेमाने आपल्याला परिपूर्णता प्राप्त होते.

मानवी मेंदूचा योग्य उपयोग करायचा असले तर शिक्षणा शिवाय पर्याय नाही. म्हणून देशात समान शिक्षण प्रसार करणे आवश्यक आहे.

तांत्रिक ज्ञानासोबत आत्म्याचे मोठेपण देखील मिळवता यायला हवे, अन्यथा त्या ज्ञानाचा उपयोग नाही.

शिष्यांना उद्याच्या आव्हानांशी दोन हात करण्याचे सामर्थ्य देतो तोच खरा शिक्षक.

आत्मपरीक्षणाच्या माध्यमातून स्वतःबद्दल जाणीव करून देण्याचे काम खर्‍या गुरूद्वारे केले जाते.

अनेक भिन्न संस्कृती, परंपरा यांना जोडणारे पुस्तक हे एकमेव साधन आहे.

शिक्षण हे प्रत्येकाला कोणत्याही आपत्ती आणि परिस्थितीशी लढण्याचे बळ देते.

माणूस जर राक्षक बनला तर तो त्याचा पराभव आहे, महामानव बनला तर तो चमत्कार आहे आणि जर माणूस माणूस झाला तर हा त्याचा विजय आहे.

स्वातंत्र्याचा खरा अर्थ म्हणजे, ज्या लोकांना स्वातंत्र्य प्राप्त झाले आहे त्यांना त्यांचे विचार मांडण्याचे पूर्ण स्वातंत्र्य दिले पाहिजे.

(वाचा: UGC Latest News: ‘यूजीसी’चा मोठा निर्णय! आता पदवी प्रमाणपत्रात होणार महत्वाचा बदल.. वाचा सविस्तर..)

Source link

Career Newsdr sarvepalli radhakrishnandr sarvepalli radhakrishnan thoughtseducation newsSchool Newsslogans for teachers dayteachers dayTeachers Day 2023teachers day best messageteachers day history
Comments (0)
Add Comment