Hospitality क्षेत्रात करिअर घडवताना…
Covid-19 नंतर जगभरात या क्षेत्रात खूपच प्रगती झाली आहे. यामुळे देशातच नाही तर परदेशातही करिअरच्या अनेक संधी होत आहेत. या क्षेत्रात करिअर घडवण्यासाठी तुमच्यात काही कौशल्ये असणे गरजेचे आहे. Hospitality मध्ये इव्हेंट मॅनेजमेंट (Event management), एविएशन इंडस्ट्री (Aviation Industries), ट्रॅवल आणि टुरिझम (Travel and Tourism) आणि हॉटेल मॅनेजमेंट (Hotel Management) अशा विविध क्षेत्रांमध्ये काम करण्याची संधी मिळते. त्यामुळे Hospitality क्षेत्रात करिअर घडवण्यासाठी तुमच्यापुढे या क्षेत्राशी संबंधित अनेक संधींचे पर्याय उपलब्ध होतता. बारावीनंतर Bsc in Hospitality Studies, Bsc in Catering Science and Hospitality management, BBA in Travel and Tourism किंवा Aviation मध्ये पदवी मिळवू शकता. शिवाय, पुढे शिकायची इच्छा असल्यास पदव्युत्तर शिक्षण घेऊ शकता.
(वाचा : कामाच्या भरपूर संधी आणि पैसे कमवण्याच्या उत्तम संधी देणारे ‘डिजिटल एज’ तुम्हाला माहिती आहे का?)
Hospitality Management मध्ये करिअर घडवताना या Skills आहेत आवश्यक :
- या क्षेत्रात काम करताना विविध स्वभावाच्या माणसांशी जुळवून घेत, त्यांच्या गरजा पूर्ण करणे गरजेचे आहे.
- त्यामुळे उत्तम संवाद कौशल्य असणे हे गरजेचे आहे. तुमच्या समोर आलेल्या माणसांच्या कलेने घेत तुम्हाला संवाद साधता आला पाहिजे.
- शियाय, परदेशातून आलेल्या क्लाइंटस (clients) येत असतात तेव्हा त्यांची भाषा समजून घेत त्यांच्याशी संवाद साधावा लागतो.
- हे क्षेत्र बरेच चर्चेत आहे. इथे ट्रेंडिंग (trending) असलेल्या गोष्टी लोक Follow करतात, त्या त्यांना हव्या हव्याश्या वाटतात. आपल्या Clients च्या आवडी निवडी काय आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला Social Media च्या trends शी जोडून ठेवण्यासाठी या क्षेत्रातील नवनवीन ट्रेंड आणि या क्षेत्रविषयी सखोल ज्ञान असणे आवशयक आहे.
- Hospitality Industry मध्ये काम करताना वेळेचे नियोजन आणि वेळ पाळण्याची सवय तुमच्या अंगी असणे गरजेचे आहे. तुमच्या clients ना कोणत्या गोष्टी कधी अपेक्षित आहेत हे जाणून घेत त्यानुसार तुम्ही काम करू शकलात तर इथे चांगलं करिअर घडवता येते.
- सोबतच, तुम्ही कठीण परिस्थिती कशी हाताळता यावरून तुमची Leadership Skill दिसून येते.
(वाचा : DTE Maharashtra Recruitment 2023: शासनाच्या तंत्रशिक्षण विभागात नोकरीची संधी; दहावीपास ते पदवीधर उमेदवारांसाठी सुवर्णसंधी)
या संस्थांमधून मिळवता येते पदवी :
Hospitality Management ही मोठी संकल्पना आहे, या अंतर्गत येणारे कोणते क्षेत्र आणि त्याच्या सबंधित कोणता कोर्स कोणत्या कॉलेजमध्ये उपलब्ध आहे; त्यानुसार तुम्ही तुमचे कॉलेज ठरवू शकता.
1. आयएचएम, मुंबई (IHM, Mumbai)
2.आयएचएम, बंगळूर (IHM, Bangalore)
3. डब्ल्यूजीएसएचए, मणिपाल कर्नाटक (WGSHA, Manipal Karnataka)
4. आयएचएम, हैद्राबाद (IHM, Hyderabad)
5. आयएचएम, दिल्ली (IHM, Delhi)
या क्षेत्राशी संबंधित विविध शाखांमध्ये काम करा..
1. गेस्ट रिलेशन (Guest Relations)
2. फूड अँड बेव्हरेजेस (Food and Beverage)
3. टुरिझम (Tourism)
4. इव्हेंट प्लॅनिंग (Event Planning)
5. एंटरटेनमेंट अँड लेजर (Entertainment and Leisure)
अश्या विविध ठिकाणी तुम्ही Front Office Manager, Director Of Housekeeping, Restaurant Manager, Chef, Travel Agent, Marketing and Public Relations म्हणून काम करू शकता. तुम्ही निवडलेल्या पदानुरूप तुमचा पगार ठरतो किंवा परदेशी जाण्याच्या संधी उपलब्ध होत असतात. इथे वाढत्या अनुभवानुसार ५ लाखांपर्यंत वेतन दर महिना मिळू शकते.
(वाचा : Career In Geography: भौगोलिक क्षेत्राशी निगडीत विषयात करिअर करायचे आहे? या क्षेत्रात नोकरीचे टेंशन नाही)