Oppo A38 चे स्पेसिफिकेशन्स
ओप्पोच्या नवीन स्मार्टफोनमध्ये ६.५६ इंचाचा एचडी प्लस आयपीएस एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. जो ७२० x १६१२ पिक्सल रिजॉल्यूशन, ९० हर्ट्झ रिफ्रेश रेट, ७२० निट्झ पीक ब्राइटनेस, १०० टक्के डीसीपीआय पी३ आणि १००% एसआरजीबी कलर गमटचा सपोर्ट मिळतो. हा एक वॉटर ड्रॉप नॉच डिजाईन असलेला डिस्प्ले आहे.
वाचा: बॅटलग्राउंड्स मोबाइल इंडिया (BGMI) चा ट्रायल पीरियड संपला! आता पुढे काय?
ओप्पो ए३८ स्मार्टफोन अँड्रॉइड आधारित कलरओएस १३.१ वर चालतो. दमदार परफॉर्मन्ससाठी कंपनीनं हेलीयो जी८५ चिपसेटचा वापर केला आहे. जोडीला ४जीबी रॅम आणि १२८जीबी पर्यंत स्टोरेज मिळते. रॅम ४जीबीनं एक्सटेंड करता येतो. तसेच इंटरनल स्टोरेज वाढवण्यासाठी मायक्रो एसडी कार्ड स्लॉट देण्यात आला आहे.
Oppo A38 मध्ये ५०००एमएएचची मोठी बॅटरी देण्यात आली आहे, जी ३३ वॉट सुपरवूक चार्जिंगला सपोर्ट करते. फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. ज्यात ५० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, २ मेगापिक्सलची पोर्ट्रेट आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. डिवाइस ४जी, वाय-फाय, जीपीएस, यूएसबी टाइप पोर्ट, ३.५mm हेडफोन जॅक, साइड फेसिंग फिंगरप्रिंट सेन्सर सारख्या फीचर्सना सपोर्ट करतो.
वाचा:
Oppo A38 ची किंमत
कंपनीनं Oppo A38 ची किंमत मात्र सांगितली नाही. परंतु लवकरच ती देखील समोर येऊ शकते. स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन बजेट सेगमेंटमध्ये लाँच केला जाऊ शकतो. कंपनीनं फोन ग्लोइंग ब्लॅक आणि ग्लोइंग गोल्ड अशा दोन कलर ऑप्शनमध्ये सादर केला आहे. लवकरच हा फोन भारतात देखील येऊ शकतो.