या भरती अंतर्गत नाविक आणि यांत्रिक पदांच्या जागा भरण्यात येणार आहे. यामध्ये नाविक(जनरल ड्यूटी), नाविक(डोमेस्टिक ब्रांच), यांत्रिक (मेकॅनिकल), यांत्रिक (इलेक्ट्रिकल), यांत्रिक (इलेक्ट्रॉनिक्स) इत्यादी पदांचा विस्तार आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ८ सप्टेंबर २०२३ पासून सुरु होणार आहे तर २२ सप्टेंबर २०२३ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तेव्हा जाणून घेऊया या भरतीचे तपशील….
पदे आणि पदसंख्या:
नाविक(जनरल ड्यूटी): २६० पदे
नाविक(डोमेस्टिक ब्रांच): ३० पदे
यांत्रिक (मेकॅनिकल): २५ पदे
यांत्रिक (इलेक्ट्रिकल): २० पदे
यांत्रिक (इलेक्ट्रॉनिक्स): १५ पदे
एकूण: ३५० पदे
(वाचा: Teachers Day 2023: आज शिक्षक दिन! जाणून घ्या हा दिवस भारतात का आणि कशासाठी साजरा केला जातो..)
वयोमर्यादा:
खुल्या प्रवर्गासाठी १८ते २२ वर्षे. OBC प्रर्वगाला कमाल वयोमर्यादेत ३ वर्षांची सूट तर SC/ST प्रवर्गातील उमेदवारांना ५ वर्षांची सूट.
पात्रता:
या भरती प्रक्रियेतील प्रत्येक पदासाठी वेगळी शैक्षणिक पात्रता आहे. परंतु नाविक (जनरल ड्युटी) पदासाठी मान्यता प्राप्त संस्थेतून दहावी परीक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक आहे. तर नाविक (डोमेस्टिक ब्रांच) साठी १०+२ म्हणजेच भौतिकशास्त्र आणि गणित विषयांसह बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तर यांत्रिक पदांसाठी १० वी उत्तीर्ण आणि संबंधित विभागाशी निगडित डिप्लोमा उत्तीर्ण असावा. अधिक तपशीलवार वाचण्यासाठी खाली दिलेली अधिसूचनेची लिंक पाहावी.
अर्ज शुल्क:
या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ३०० रुपये शुल्क भरावे लागेल. पण, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना शुल्क माफ आहे. अर्ज करताना डेबिट कार्ड आणि इंटरनेट बँकिंगद्वारे अर्ज शुल्क भरले जाऊ शकते. अधिसूचनेत याची सविस्तर माहिती आहे.
अर्ज कसा करावा:
या भरतीसाठी उमेदवारांना अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन माध्यमातून अर्ज करावा लागेल. अर्ज २२ सप्टेंबरच्या आधी करणे बंधनकारक आहे.
परीक्षा:
अर्ज प्रक्रिया पार पडल्यानंतर पात्र उमेदवारांची संगणक-आधारित एक परीक्षा होईल. या परीक्षेत पात्र उमेदवारांची फिटनेस टेस्ट आणि अन्य काही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अंतिम निवड केली जाईल.
भरतीची सविस्तर अधिसूचना वाचण्यासाठी https://www.davp.nic.in/WriteReadData/ADS/eng_10119_5_2324b.pdf या लिंकवर क्लिक करा.
तसेच भारतीय तटरक्षक दलाच्या या अधिकृत संकेत स्थळाला भेट देऊन तुम्ही भरतीची माहिती घेऊ शकता.
(वाचा: Teacher’s Day 2023: आयुष्याला मिळेल नवी दिशा! शिक्षक दिनी वाचा डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे प्रेरणादायी विचार..)