शूजपासून-कपड्यांपर्यंत, साड्यांपासून-सूटपर्यंतच्या फॅशनेबल डिझायनिंगमध्ये करिअर करायचे आहे; फॅशन डिझायनर हा पर्याय खास तुमच्यासाठी

Career Opportunities In Fashion Designing: रॅम्पवरचे झगमगते शोज, त्यातील चमकधमक आणि स्टायलिश पेहराव पाहून आपणही असे कपडे घालावे किंवा डिझाईन करे असे अनेकांना वाटते. झगमगत्या या विश्वाच करिअरम्हणून विचार चांगला आहे. परंतु, त्यात कष्टही खूप आहेत. मुळात फॅशन डिझायनिंग म्हणजे केवळ कपडे शिवणे नव्हे. त्यापलीकडेही अनेक गोष्टीं या क्षेत्रात समाविष्ट आहेत. शिवणाचे प्रकार, विविध प्रकारच्या टाक्यांचे प्रकार, टिपा मारणे, डिझाइन काढणे, प्रत्यक्ष कपडे शिवणे, रंगसंगती, कपडय़ांवरील जरीवर्क किंवा अन्य कलाकुसर करणे या सगळ्याचा समावेश फॅशन डिझायनिंगमध्ये होतो.

फॅशन इंडस्ट्री खूप वेगाने पुढे जात आहे. या क्षेत्रातमध्ये काम करणार्‍या लोकांची संख्या आणि मागणी वाढत चालली आहे. अनेक तरुण-तरुणीही या क्षेत्राचा करियर म्हणून विचार करू लागले आहेत. या क्षेत्रात करिअरच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. चित्रपट आणि टीव्ही इंडस्ट्रीला जवळजवळ आयटी इंडस्ट्रीचा दर्जा आहे, कारण सर्व बड्या स्टार्सचे स्वतःसाठी वेगवेगळे डिझायनर असतात. हल्ली शूजपासून-कपड्यांपर्यंत, साड्यांपासून-सूटपर्यंतच्या डिझाइनवर काम केले जात आहे. त्यात करिअर करून तुम्ही लाखो रुपयांच्या पगाराची नोकरीही करू शकता.

(वाचा : Career In Geography: भौगोलिक क्षेत्राशी निगडीत विषयात करिअर करायचे आहे? या क्षेत्रात नोकरीचे टेंशन नाही)

काही संस्था याला ‘फॅशन डिझायनिंग कोर्स’ असे म्हणतात तर काही संस्था ‘फॅशन टेक्नॉलॉजी’. पण हा एकाच प्रकारचा कोर्स असून त्यातला अभ्यासक्रमही सारखाच असतो. फॅशन डिझायनिंगचे आता अनेक अभ्यासक्रम उपलब्ध झाले आहेत. फक्त गुगल करायची खोटी की त्याचे अनेक पर्याय आणि संस्था आपल्याला दिसतात. परंतु आंधळेपणाने कोणत्याही संस्थेवर विश्वास ठेवणे टाळा.

फॅशन इंडस्ट्रीमध्ये करिअर घडवण्यासाठी पदविका आणि पदवी अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. यात एक वर्ष, दोन वर्षे, तीन वर्षे अशा वेगवेगळ्या कालावधीचे अभ्यासक्रम असतात. जसजसा अभ्यासक्रमाचा कालावधी वाढत जातो त्याप्रमाणे या विषयातील सखोलताही वाढते.

फॅशन डिझायनर बनण्यासाठी…

प्रत्येक गोष्टीचे शिक्षण किंवा प्रशिक्षण घेण्यासाठी ठरावीक शैक्षणिक पात्रता लागते. परंतु, फॅशन डिझायनिंगचे क्षेत्रात करिअर करण्यासाठी विज्ञान, कला, वाणिज्य यांसारख्या कोणत्याही शाखांतून शिक्षण घेतलेले विद्यार्थी फॅशन डिझायनिंगचे प्रशिक्षण घेऊ शकतात. या क्षेत्रात केवळ शालेय शिक्षणापेक्षा कलेला महत्त्व असते. तरीही किमान दहावीपर्यंतचे शिक्षण आवश्यक आहे. अन्यथा अभ्यासक्रमातील अनेक संज्ञा विद्यार्थ्यांना कळत नाहीत. काही संस्था प्रवेशपरीक्षाही घेतात तर काही ठिकाणी केवळ १०-१२ वीच्या गुणांवर प्रवेश दिला जातो.

(वाचा : टॅटू आर्टिस्ट म्हणून फुलटाइम किंवा फ्रिलान्स काम करणे हाही करिअरचा उत्तम पर्याय; नाव आणि पैसा मिळवून देणारी संधी)

फॅशन इंडस्ट्रीमधील करिअरच्या उपलब्ध संधी :

  • किरकोळ खरेदीदार (Retail buyers)
  • ज्वेलरी आणि फुटवेअर डिझायनर (Jewellery and Footwear Design)
  • टेक्सटाईल डिझायनर (Textile Designer)
  • फॅशन रिपोर्टर (Fashion Reporter)
  • फॅशन फोटोग्राफर (Fashion Photographer)
  • फॅशन मॉडेल (Fashion Model)
  • फॅशन स्टायलिस्ट (Fashion Stylist)
  • मेकअप आर्टिस्ट (Makeup Artist)

प्रशिक्षण कुठे मिळेल?

अनेक खासगी संस्थांमध्ये आता या विषयाचे प्रशिक्षण दिले जाते. परंतु कोणत्याही अभ्यासक्रमाची निवड करण्याआधी संस्थेची पारख करणे महत्त्वाचे असते.

एनआयएफटी – http://www.nift.ac.in
आयएनआयएफडी- http:// http://www.inifdmumbai. com
एसएनडीटी कॉलेज – http://sndt.ac.in/
निर्मला निकेतन – http://www.nirmalaniketan. com/
जेडी इन्स्टिटय़ूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी- http://www.jdinstitute.com/

(वाचा : Hospitality Management करिअरच्या दृष्टीने हटके आणि पैसे मिळवून देणारा उत्तम पर्याय; जाणून घ्या या कोर्सविषयी)

Source link

career opportunities in fashion designingcelebrity costume designercelebrity stylistfashionfashion designerfashion industrytop fashion designerफॅशन डिझायनिंग
Comments (0)
Add Comment