एसबीआय भरती २०२३ मधील पदे आणि पदसंख्या:
आर्मरर्स – १८ जागा
कंट्रोल रूम ऑपरेटर – ८९ जागा
एकूण रिक्त जागा – १०७
वयोमर्यादा:
आर्मरर पदासाठी उमेदवाराचे वय कमीत कमी २० वर्षे ते जास्तीत जास्त ४५ वर्षे असावे. कंट्रोल रूम ऑपरेटरच्या पदासाठी, उमेदवाराचे किमान वय २० वर्षे आणि माजी सैनिक/ माजी CAPF/AR यांच्यासाठी कमाल वय ४८ वर्षे आणि राज्य अग्निशमन सेवा कर्मचार्यांसाठी ३५ वर्षे असावे.
(वाचा: MSCE Scholarship Exam 2023: पाचवी, आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा १८ फेब्रुवारीला! विद्यार्थ्यांनो आजच करा अर्ज..)
अर्ज शुल्क:
या भरतीसाठी कोणतेही अर्ज शुल्क नाही.
या भरतीसंदर्भात सविस्तर अधिसूचना वाचण्यासाठी https://sbi.co.in/documents/77530/36548767/050920231755-Detailed+AD+Final.pdf/ या लिंकवर क्लिक करा.
अर्ज कसा करावा:
या भरती प्रक्रियेतील रीक्त पदांसाठी अर्ज करण्यासाठी स्टेट बँक ओक इंडियाच्या https://bank.sbi/web/careers या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. त्यानंतर होमपेज वरील JOIN SBI/ Recruitment टॅबवर क्लिक करा. तिथे भरतीसाठीच्या लिंक येतील. त्यावर आपली अचूक नोंदणी करून योग्य त्या कागदपत्रांची पूर्तता करून अर्ज सादर करा.
(वाचा: WCL Nagpur Recruitment 2023: ‘वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड’ मध्ये ११९१ जागांसाठी महाभरती! आजच करा अर्ज..)