एवढ्या कमी किंमतीत पहिल्यांदाच १२जीबी रॅम, २५६ जीबी स्टोरेज; ६०००एमएएच बॅटरीसह Moto G54 5G लाँच

बहुप्रतीक्षित moto G54 5G भारतात लाँच झाला आहे. ह्याची खासियत म्हणजे २० हजारांच्या बजेटमध्ये देखील १२ जीबी रॅमसह २५६जीबी स्टोरेज देण्यात आली आहे. त्याचबरोबर हा फोन ६०००एमएएचची बॅटरी, ५० मेगापिक्सलचा OIS कॅमेरा, ६.५ इंचाचा मोठा डिस्प्ले असे स्पेक्स देतो. चला जाणून घेऊया moto G54 5G ची किंमत आणि संपूर्ण माहिती.

Moto G54 5G ची किंमत

moto G54 5G च्या बेस मॉडेलमध्ये ८जीबी रॅम व १२८जीबी स्टोरेज मिळते, तर टॉप मॉडेल १२जीबी रॅमसह २५६जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो. ह्या मॉडेल्सची अनुक्रमे किंमत १५,९९९ रुपये आणि १८,९९९ रुपये आहे. फोन कंपनीच्या वेबसाइटसह फ्लिपकार्ट आणि रिटेल स्टोरवर विकला जाईल. कंपनीनं मिडनाइट ब्लू, पर्ल ब्लू आणि मिंट ग्रीन कलर ऑप्शन सादर केले आहेत. लाँच ऑफर अंतर्गत आयसीआयसीआय बँकेच्या कार्डवर १,५०० रुपयांचा इंस्टंट डिस्काउंट मिळेल, तसेच १,५०० रुपयांचा अतिरिक्त बोनस देखील मिळत आहे.

वाचा: India नाव बदलून Bharat झालं तर ‘डॉट इन’ वेबसाइट बंद होणार? जाणून घ्या माहिती

moto G54 5G चे स्पेसिफिकेशन्स

moto G54 5G मध्ये ६.५ इंचाचा आयपीएस एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. जो फुल एचडी प्लस २४०० x १०८० पिक्सल रिजॉल्यूशन आणि २०:९ अ‍ॅस्पेक्ट रेश्यो आणि १२० हर्ट्झ रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. moto G54 5G फोनचे डायमेंशन १६१.५६x ७३.८२x ८.८९mm आणि वजन १९२ ग्राम का आहे.

हा मोबाइल अँड्रॉइड १३ वर चालतो. कंपनीनं मीडियाटेक डायमेंसीटी ७०२० प्रोसेसरचा वापर केला आहे. जो २.२ गिगाहर्ट्झ क्लॉक स्पीडवर चालतो. जोडीला बीएक्सएम-८-२५६ जीपीयू देखील आहे. डिवाइसमध्ये १२जीबी पर्यंत रॅम व २५६जीबी पर्यंत स्टोरेज देण्यात आली आहे.

फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. ज्यात ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायजेशनसह ५० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो.

वाचा: कर्व्ह डिस्प्ले, दमदार प्रोसेसर असणाऱ्या Honor 90 5G ची किंमत झाली लीक, समोर आली महत्त्वाची माहिती

फोनमध्ये ६०००एमएएचची मोठी बॅटरी मिळते. जी ३३ वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. डिवाइस ड्युअल सिम ५जी, वाय-फाय, ब्लूटूथ ५.३, जीपीएस, आयपी५२ रेटिंग, ड्युअल स्टीरियो स्पिकर्ससह बाजारात आला आहे. फोनमधील स्टोरेज मायक्रो एसडी कार्डच्या मदतीनं १टीबी पर्यंत वाढवता येते.

Source link

moto g54 5gmoto g54 cameramoto g54 colormoto g54 featuresmoto g54 launchedmoto g54 pricemoto g54 specsmoto g54 variantsMotorola
Comments (0)
Add Comment