पुण्यातील दर्ग्यातील बांधकाम पाडण्याची मागणी वरून आमदार निलेश राणे व महेश लांडगे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

पुणे : पुण्येश्वर पुनर्निर्माण समिती’च्या वतीने पुणे महानगरपालिकेच्या बाहेर भाजप आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी (दि.4) आंदोलन करण्यात आले. त्या आंदोलनादरम्यान आमदार नितेश राणे आणि महेश लांडगे या दोन्ही नेत्यांनी पुण्येश्वर परिसरातील दर्ग्याबाबत केलेल्या वक्तव्यावर पुण्यातील मुस्लिम संघटनांनी आक्षेप घेतला आहे.
भाजपचे आमदार नितेश राणे आणि महेश लांडगे यांनी पुण्येश्वर मंदिराच्या परिसरातील दर्ग्याबाबात केलेल्या वक्तव्याबाबत दर्ग्याचे विश्वस्त आणि मुस्लिम संघटनांनी मंगळवारी (दि.5) पुण्याचे पोलीस आयुक्त रितेश कुमार सह पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांची भेट घेऊन दोन्ही भाजप आमदारांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. तसेच समस्त हिंदू आघाडीचे प्रमुख मिलिंद एकबोटे यांच्यावर देखील कारवाई करण्याची मागणी पोलिसांना दिलेल्या निवेदनात केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा मुस्लिम संघटनांनी दिला आहे. पुण्येश्वर मंदिराच्या परिसरातील दर्ग्यातील बांधकाम पाडण्याची मागणी भाजपच्या आमदारांनी केली होती. त्यानंतर मुस्लिम संघटनांनी पोलीस आयुक्तांची भेट घेतली.

ही मंडळी जाणून बुजून फक्त स्वत:चा राजकीय हेतू साध्य करण्यासाठी आणि पुण्यासारख्या शांत शहरचे वातावरण खराब करण्याच्या हेतूने जातीय तणाव निर्माण करण्यासाठी ‘पुण्येश्वर निर्माण समिती सारख्या संघटना बनवून हिंदू-मुस्लीम समाजात तेढ आणि दंगली घडवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे. महाराष्ट्र शासनाचे आमदार असून देखील कुठल्याही स्वरुपाची सत्य आणि खरी माहिती न घेता सामान्य लोकांची दिशाभूल करत आहे. आमदार नितेश राणे आणि महेश लांडगे यांनी भडकाऊ आणि चिथावणीखोर धमक्यादेखील दिल्या आहेत, असं पोलीस आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

आमदार नितेश राणे यांनी स्वत:ची लायकी दाखवून अत्यंत खालच्या पातळीवर भाषण केले.
त्यांनी पोलिसांच्या कार्य़क्षमतेवर प्रश्न उपस्थित करत दोन समाजात तेढ निर्माण होईल असे विधान केले आहे.
तर आमदार महेश लांडगे यांनी देखील पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांची नावे घेत धमकी दिली
असून 48 तासांच्या आत जर कारवाई केली नाही तर बाबरीप्रमाणे मशीद
पाडण्याची भाषा केली आहे. एकतर हे दोन्ही आमदार आमच्या भागाचे नाहीत,
या दोघांचा काहीही संबंध नसताना केवळ शासकीय अधिकारी जे निरपेक्षपणाने काम करत आहेत त्यांना धमकावण्याचे काम केल्याचा आरोप मुस्लीम संघटनांनी केला आहे.

Comments (0)
Add Comment