या पदासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया सुरू असून १६ सप्टेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. या भरतीसाठीची पात्रता, वयोमर्यादा आणि अर्ज कसा करायचा हे जाणून घेऊया..
(वाचा: SBI Recruitment 2023: ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’ मध्ये १०७ जागांसाठी भरती! जाणून घ्या काय आहे पात्रता..)
एनसीबी भरतीमधील मधील पद आणि पदसंख्या:
इंटेलिजन्स ऑफिसर – ६८ जागा
एकूण रिक्त जागा ६८
वयोमर्यादा: जास्तीत जास्त ५६ वर्षे वय असावे.
पात्रता: या पदासाठीची पात्रता अधिसूचनेत नमूद केली आहे. त्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करावे.
भरती संदर्भातील सविस्तर अधिसूचना वाचण्यासाठी https://narcoticsindia.nic.in/vacancies/IO.pdf या लिंकल भेट द्या.
अर्ज करण्याची पद्धती: ऑफलाईन
अर्ज पाठवण्पयाचा पत्ता: उपमहासंचालक (मुख्यालय), एनसीबी पश्चिम ब्लॉक क्रमांक १, विंग क्रमांक ५, आर.के.पुरम, नवी दिल्ली – ११००६६
अर्ज करण्याची शेवटची तारीख: १६ सप्टेंबर २०२३
अधिक माहितीसाठी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोची अधिकृत वेबसाईट: narcoticsindia.nic.in
अर्ज कसा करावा: या भरती साठी ऑफलाइन अर्ज करायचा आहे. अधिसूचनेत नमूद केल्या प्रमाणे सर्व तपशील आणि दस्तऐवज यांची पूर्तता करून तो वर दिलेल्या पत्त्यावर विहित वेळेच्या आधी म्हणजे १६ स्पटेंबर पर्यंत पोहोचायला हवा.
(वाचा: WCL Nagpur Recruitment 2023: ‘वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड’ मध्ये ११९१ जागांसाठी महाभरती! आजच करा अर्ज..)