जेव्हापासून कृत्रिम बुद्धीमत्तेची संकल्पना सत्यात उतरली, तेव्हापासून एआयने लोकांच्या जीवनावर महत्त्वपूर्ण भाग बनायला सुरुवात केली आहे.Chat GPT पासून ते अगदी विविध एडिटिंगच्या तंत्रामध्येही AI ने काम करायला सुरुवात केली आहे. आज, मशीन्सना तोंडी आदेश समजतात, चित्रे ओळखतात, कार चालवितात, गेम्स खेळतात, एडिटिंग आणि मानवांच्या कार्यपद्धतीपेक्षा बरेच कामे करतात. हे क्षेत्र अत्यंत वेगाने वाढत आहे. त्यामुळेच या क्षेत्रात करिअरच्या अनेक संधी आहेत. एआय क्षेत्रात रोजगाराच्या संधी वाढणार असून, ऑटोमेशन आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स एक्स्पर्ट्सना असलेली मागणी वेगाने वाढत आहे.
Artificial Intelligence या क्षेत्रात करिअर करायचे असल्यास, सायन्स शाखेतून बारावी होणे आणि त्यानंतर कम्प्युटर सायन्स किंवा इंजिनीअरिंग विषयात पदवीधर असणे आवश्यक आहे. त्यानंतर आर्टिफिशियल इंटेलिजन्सशी निगडित विविध क्षेत्रांत स्पेशलायझेशन करून त्यात एक्स्पर्ट होता येते.
आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्राशी निगडित प्रमुख कोर्सेस :
- मशीन लर्निंग आणि एआय या विषयांत पदव्युत्तर पदवी
- फाउंडेशन ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग
- आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग या विषयात पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्राम
- फुल स्टॅक मशीन लर्निंग अँड आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्रोग्राम
- आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डीप लर्निंग या विषयात पोस्ट ग्रॅज्युएट सर्टिफिकेट प्रोग्राम
या संस्थांमध्ये एआयचे अभ्यासक्रम उपलब्ध :
० आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्राशी निगडित कोर्सेस आयआयटी कॉलेजेसमध्ये करता येतात. खरगपूर, दिल्ली, मुंबई, कानपूर, मद्रास, गुवाहाटी, रूरकी या शहरांतल्या आयआयटी कॉलेजेसमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सशी संबंधित कोर्सेस आहेत.
० याव्यतिरित बंगळूरमधील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, नवी दिल्लीतली नेताजी सुभाष इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, बिट्स-पिलानी, बेंगळुरूतलं सेंटर फॉर आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड रोबॉटिक्स, म्हैसूरमधली नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग, अलाहाबादमधली इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, तसंच हैदराबाद विद्यापीठ या संस्थांमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सशी निगडित कोर्सेस उपलब्ध आहेत.
मिळतो एवढा पगार :
- आर्टिफिशियल इंटेलिजन्स या क्षेत्रात शिक्षण घेतलेल्या मोठ्या पगाराची नोकरी मिळू शकते.
- आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रातली पदवी घेतलेल्या विद्यार्थ्याला सुरुवातीलाच महिन्याला ५०-६० हजार रुपयांपासून एक लाख रुपयांपर्यंत पगार मिळू शकतो.
- त्यानंतर अनुभव आणि कौशल्य यांच्या आधारे पगाराची रक्कम कमी-जास्त होऊ शकते.