धुळ्यामध्ये आज शासन आपल्या दारी रोजगार मेळावा! १०० हून अधिक उमेदवारांना मिळणार नोकरीची संधी..

Shasan Aplya Dari Rojgar Melava Dhule: देशासह राज्यामध्ये वाढत असलेला रोजगाराचा प्रश्न लक्षात घेऊन त्यावर तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने यात पुढाकार घेतला आहे. तरुणांच्या हाताला काम मिळावे यासाठी शासन रोजगाराच्या संधी घेऊन जिल्हया-जिल्ह्यात पोहोचत आहे. आज गुरुवार, ७ स्पटेंबर रोजी धुळे जिल्ह्यात शासनाचा रोजगार मेळावा होणार आहे.

राज्य शासनाच्या वतीने ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम राज्यभरात सुरू आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून सामान्यांचे प्रसन्न सोडवण्यासोबतच त्या-त्या जिल्ह्यातील तरुणांना रोजगार देखील मिळवून दिला जात आहे. यासाठी ‘शासन आपल्या दारी’ या योजनेअंतर्गत ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा/ जागेवरच निवड’ ही मोहीम राबवली जात आहे. याच अंतर्गत आज धुळ्यात १०० हून अधिकांना नोकरी मिळणार आहे.

धुळे येथे आयोजित करण्यात आलेल्या रोजगार मेळाव्यात बी.कॉम. बीबीए, बीएससी, एमकॉम, एमबीए, एमएससी पदवी धारकांना (B.COM, BBA, B.SC, M.COM .MBA, M.SC) नोकरीची संधी मिळणार आहे. या रोजगार मेळाव्याची नांदणी ऑनलाइन पद्धतीने करायची आहे. तर रोजगार मेळावा हा प्रत्यक्ष स्वरुपात पार पडेल.

(वाचा: HPCL Recruitment 2023: ‘हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड’मध्ये भरती.. जाणून घ्या कसा करायचा अर्ज..)

धुळे येथे होणार्‍या रोजगार मेळाव्याचे तपशील पुढीलप्रमाणे:

रोजगार मेळाव्याची तारीख: ७ सप्टेंबर २०२३

विभाग: नाशिक

जिल्हा: धुळे

मेळाव्याचा पत्ता: जुने जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, प्रशासकीय इमारत, धुळे.

वेळ: सकाळी १० वाजता

पद संख्या: १०० हून अधिक.

अर्ज पध्दती: ऑनलाईन

अर्ज करण्यासाठी https://rojgar.mahaswayam.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.

या संकेत स्थळावर रोजगार मेळाव्याचे आणि भरतीचे संपूर्ण तपशील आहेत. संकेत स्थळावर धुळे जिल्हा भरतीवर क्लिक करून तुम्हाला संबधित पदांसाठी अर्ज करता येईल. त्यानंतर प्रत्यक्ष मेळाव्यात जाऊन सहभागी होता येईल.

(वाचा: SBI Recruitment 2023: ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’ मध्ये १०७ जागांसाठी भरती! जाणून घ्या काय आहे पात्रता..)

Source link

bcom jobsbsc jobsDhule Job Fairdhule jobsemployment fairjob fair newsmba jobsrojgar melava 2023shasan aplya dari dhuleshasan aplya dari rojgar melava
Comments (0)
Add Comment