पुणे:आधार व्हॅलिडेशन कार्यशाळा आझम कॅम्पस

पुणे:आधार व्हॅलिडेशन कार्यशाळा
दिनांक ३० ऑगस्ट २०२३ रोजी आझम कॅम्पसमध्ये स्वयंअर्थशाशित शाळांसाठी एक दिवसाची आधार व्हॅलिडेशन कार्यशाळा संपन्न झाली.या कार्यशाळेसाठी पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी(माध्य) सौ सुनंदा वाखारे व शिक्षणाधिकारी(प्राथमिक) सौ संध्या गायकवाड मॅडम यांनी विशेष मार्गदर्शन केले.यावेळी तज्ज्ञ मार्गदर्शक श्री शिवाजी शिंदे सर यांनी आधार व्हॅलिडेशन कसे करावे याविषयी विस्तृत माहिती दिली.या कार्यशाळेत सुमारे दोनशे शाळांच्या कर्मचारी व मुख्याध्यापकांनी आपला सहभाग नोंदवला.या कार्यशाळेस उपशिक्षणाधिकारी सौ अस्मा मोमीन व विविध बिटाचे विस्ताराधिकारी तसेच अँग्लो उर्दू बॉईज हायस्कूलचे प्राचार्य राज मुजावर सर हे ही उपस्थित होते

Comments (0)
Add Comment