पुणे:’स्नेहसेवा’ मैत्रेय चॅरिटेबल सोसायटी

पुणे:’स्नेहसेवा’ मैत्रेय चॅरिटेबल सोसायटी पुणे गेली २५ वर्षांपासून दिवाळीसाठी सीमेवर लढणाऱ्या जवानांसाठी शाळेतील विद्यार्थ्यांकडून भेटकार्ड बनवण्याचा स्तुत्य उपक्रम राबवत आहे.याही वर्षी या उपक्रमाअंतर्गत अँग्लो उर्दू बॉईज हायस्कूल मधील सुमारे दोनशे विद्यार्थ्यांनी विविध प्रकारची भेटकार्ड बनवून आपला सहभाग नोंदवला.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशालेचे प्राचार्य श्री राज मुजावर सर यांनी विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन केले.हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रशालेच्या उपप्राचार्य सौ परवीन शेख व कलाशिक्षक श्री जावेद पठाण सर यांनी परिश्रम घेतले

Comments (0)
Add Comment