बॉक्स ऑफिस रिपोर्ट्सची आकडेवारी देणाऱ्या Sacnilk या वेबसाईटच्या रिपोर्टनुसार, ‘जवान’ चित्रपट पहिल्याच दिवशी म्हणजे ओपनिंगलाच खळबळ माजवणार आहे. अनेक रेकॉर्ड्स एका झटक्यात मोडीत निघतील असे दिसत आहे. गेल्या काही वर्षांत बॉक्स ऑफिसला लागलेली उतरती कळा ‘पठाण’, ‘गदर २’ आणि आता ‘जवान’ने पुन्हा एकदा बहरुन जात आहे. रिपोर्टनुसार, साऊथ आणि बॉलिवूड स्टार्सचा अभिनय असलेला हा चित्रपट पहिल्याच दिवशी हिंदीमध्ये जवळपास ७७ कोटी रुपयांचा गल्ला जमवणार आहे. दुसरीकडे, ओपनिंगवर हिंदीमध्ये ६५ कोटींची कमाई होण्याची अपेक्षा आहे.
‘जवान’ पहिल्याच दिवशी देशभरात बंपर ओपनिंग करणार
जवानचे आगाऊ बुकिंग: हा चित्रपट हिंदी व्यतिरिक्त तामिळ आणि तेलुगूमध्येही प्रदर्शित होत आहे. तमिळ आणि तेलुगू या दोन्ही भाषांमध्ये हा चित्रपट ४ कोटी रुपये कमवू शकतो. म्हणजेच, चित्रपट तिन्ही भाषांमध्ये ७३ कोटी रुपयांचे निव्वळ कलेक्शन आणि ८४.५० कोटी रुपयांचे एकूण कलेक्शन करू शकतो अशी अपेक्षा आहे.
सुट्टीचा पूर्ण फायदा झाला
सुरुवातीच्या दिवशी कमाईचा हा आकडा आगाऊ बुकिंगमुळे दिसून येत आहे. मॉर्निंग शोजनंतर चित्रपटाची कमाई आणखी वाढणार की कमी होणार ते दिसून येईल. मात्र, जन्माष्टमीच्या सुट्टीमुळे या चित्रपटाला ओपनिंगचा मोठा फायदा झाला आहे.
‘जवान’ अनेक टॉप चित्रपटांचे रेकॉर्ड मोडणार आहे
‘जवान’ची ओपनिंग डे कमाई आजवरच्या हिंदीतील सर्व भारतीय चित्रपटांच्या कमाईला मागे टाकत आहे. आजच्या आघाडीच्या चित्रपटांनी पहिल्या दिवशी किती कमाई केली ते पाहूया.
चित्रपट – पहिल्या दिवसाची कमाई (हिंदीमध्ये)
‘बाहुबली २’ – ४१ कोटी रुपये
‘KGF Chapter २’- ५३.९५ कोटी
‘पठाण’- ५५ कोटी रु
‘RRR’- २०.०७ कोटी रुपये
‘गदर २’ – ४०.०१ कोटी
‘जवान’ दोन दिवसांत बजेटचा खर्च भरुन काढेल
जवान बजेट: पहिल्या दोन दिवसांतच चित्रपट त्याच्या खर्चापेक्षा जास्त कमाई करेल अशी अपेक्षा आहे. जवळपास ३०० कोटींच्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट जवळपास ५००० स्क्रीन्सवर प्रदर्शित होत आहे. या ‘जवान’ चित्रपटात शाहरुख खानची दुहेरी भूमिका पाहायला मिळणार आहे.
‘जवान’मध्ये अनेक अप्रतिम कलाकार दिसणार
शाहरुख खान, नयनतारा, विजय सेतुपती, सान्या मल्होत्रा आणि प्रियामणी व्यतिरिक्त या चित्रपटात दीपिका पादुकोण आणि थलपथी विजय देखील कॅमिओ भूमिकेत दिसणार आहेत.