या भरतीतील १९ हजार पदांपैकी १ हजारांहून अधिक पदे नाशिक नगर परिषदेसाठी भरण्यात येणार होती. त्याला तूफान प्रतिसाद मिळाला आहे. नाशिक जिल्हा परिषदेतील एकूण १ हजार ३८ रिक्त पदांसाठी ६४ हजार ८० अर्ज दाखल झाले आहेत. भरती प्रक्रियेतील या अर्जातून जवळपास ५ कोटी ७५ लाख ४३ हजार १०० रुपयांचा महसूल जमा झाल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी दिली.
नाशिक जिल्हा परिषदेमध्ये २० संवर्गातील १०३८ रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती. यामध्ये (कंत्राटी) ग्रामसेवक पदाच्या ५० जागांसाठी ११ हजार ७२८ अर्ज आले आहेत. आरोग्य पर्यवेक्षकच्या ३ जागांसाठी ९१, आरोग्य परिचारिका पदाच्या ५९७ जागांसाठी ३९५४, आरोग्य सेवक पदाच्या ८५ जागांसाठी १७ हजार ५७९ तर आरोग्य सेवक (फवारणी) १२६ जागांसाठी ६४८८ उमेदवारांनी अर्ज केले आहेत.
(वाचा: SBI Recruitment 2023: ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’ मध्ये महाभरती! २००० रिक्त जागा भरणार; आजच करा अर्ज..)
औषध निर्माण अधिकारी पदाच्या २० जागांसाठी ५०५७ अर्ज, प्रयोगशाळा तंत्रज्ञच्या १४ जागांसाठी २६०७ अर्ज, विस्तार अधिकारी (सांख्यिकी) २ जागांसाठी ३३७ अर्ज, विस्तार अधिकारी(शिक्षण) या ७ जागांसाठी १०४७ अर्ज, वरिष्ठ सहाय्यकच्या ३ जागांसाठी १७७३ अर्ज तर पशुधन पर्यवेक्षक पदाच्या २८ जागांसाठी ७७४ अर्ज आले आहे.
या व्यतिरिक्त कनिष्ठ आरेखक पदाच्या २ जागांसाठी ४१, कनिष्ठ लेखा अधिकारी पदाच्याएका जागेसाठी ४८, कनिष्ठ सहाय्यक (लेखा) पदाच्या ५ जागांसाठी ८६३, कनिष्ठ सहाय्यक (लिपीक) २२ जागांसाठी २६६७, मुख्य सेवीका / पर्यवेक्षिका ४ जागांसाठी ६७७, कनिष्ठ यांत्रिकी पदाच्या एका जागेसाठी ४४, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) ३४ जागांसाठी ५२६८, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक ३३ जागांसाठी २९४२ तर संख्या लघुलेखक या जागेसाठी जागेसाठी ९५ उमेदवारांनी अर्ज केले आहेत. असे एकूण ६४,०८० अर्ज प्राप्त झाले आहेत.
आता लवकरच जिल्हा परिषद भरतीच्या परीक्षा जाहीर होतील. त्याचे वेळापत्रक परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर दिले जाईल. राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये एकाच कालावधीमध्ये पदनिहाय संगणकीकृत परीक्षा होणार असल्यामुळे उमेदवाराने एकाच संवर्गासाठी एकापेक्षा जास्त जिल्हा परिषदांना अर्ज केला असेल तर तो बाद ठरू शकतो.
(वाचा: HPCL Recruitment 2023: ‘हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड’मध्ये भरती.. जाणून घ्या कसा करायचा अर्ज.. )