कोंढव्यात ब्रॅण्डेड कंपनीचा बनावट लोगो लावून कपड्यांची विक्री सुरू असताना, पोलिसांच्या छापा

कोंढव्यात ब्रॅण्डेड कंपनीचा बनावट लोगो लावून कपड्यांची विक्री सुरू असताना, पोलिसांनी छापा टाकून माल जप्त करत कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पुमा कंपनीचा बनावट लोगो वापरुन ग्राहकांना कपड्यांची विक्री करुन फसवणूक केली जात असल्याची माहिती कंपनीच्या अधिकाऱ्यांना मिळाल्यानंतर कोंढवा पोलिसांनी छापा मारुन लाखो रुपयांचे कपडे जप्त केले आहेत.

बुधवारी रायबा फॉर मेन्स या दुकानात कारवाई करण्यात आली.याबाबत कंपनीचे फिल्ड ऑफिसर महेंद्र सोहन सिंग वय ३६ रा. रसिका सोसायटी, कसबा पेठे पुणे, यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात आहे. पोलिसांनी विशाल दिलीपराव पिसाळ वय-२८ रा. मोरे चाळ, कोंढवा खुर्द मुळ रा. मुपो व्याहळी कॉलनी ता. वाई, जि. सातारा याच्यावर कॉपीराईट अॅक्ट कलम ६३,६४, ६५ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास कोंढवा पोलिस करीत आहे.

Comments (0)
Add Comment