HONOR 90 इंडिया लाँच डिटेल
आता भारतात ऑनर कंपनीचे स्मार्टफोन स्वतः चिनी कंपनी विकणार नाही तर ते काम एचटेक ब्रँडला देण्यात आलं आहे. त्यामुळे आगामी HONOR 90 5G स्मार्टफोन HTech ब्रँडचा भारतातील पहिला स्मार्टफोन असेल. कंपनीनं केल्या घोषणेनुसार ऑनर ९० ५जी चा इंडिया लाँच इव्हेंट १४ सप्टेंबर दुपारी १२.३० वाजता सुरु होईल. ज्याचे थेट प्रक्षेपण कंपनीच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसह शॉपिंग साइट अॅमेझॉनवर देखील केलं जाईल.
वाचा: घरचा फ्रीज जास्त काळ टिकवायचा आहे? ‘या’ चुका करणं टाळा!
HONOR 90 चे स्पेसिफिकेशन्स
Honor 90 मध्ये फोटोग्राफीसाठी २०० मेगापिक्सलच्या मुख्य कॅमेऱ्यासह ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. मुख्य कमाईत इलेक्ट्रॉनिक इमेज स्टेबिलाइजेशनला सपोर्ट करेल. त्याचबरोबर १२मेगापिक्सलची अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर असेल. सेल्फी आणि व्हिडीओ कालिंगसाठी ५० मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळेल.
फोनमध्ये १.५के रेजोल्यूशनसह ६.७ इंचाचा कर्व अॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्यात १२० हर्ट्झ रिफ्रेश रेट, ३८४०हर्ट्झ पीडब्लूएम डिमिंगचा सपोर्ट मिळेल. हा फोन अँड्रॉइड १३ आधारित मॅजिकओएस ७.१ वर चालेल.
प्रोसेसिंगसाठी Honor 90 5G मध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन ७ जेन १ चिपसेट मिळू शकतो. पावर बॅकअपसाठी डिवाइसमध्ये ५,०००एमएएचच्या बॅटरीचा वापर केला जाऊ शकतो. त्याचबरोबर ६६वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी देखील दिली जाऊ शकते.
वाचा: स्पेशल सेलमध्ये स्पेशल डिस्काउंट; स्वस्तात Realme C51 विकत घेण्यासाठी आज फक्त २ तासांचा वेळ
स्मार्टफोनमधील रॅम आणि स्टोरेज मॉडेलची माहिती अधिकृत माहिती मिळाली नाही. परंतु लिक्सनुसार हा फोन ३० ते ४० हजारांच्या दरम्यान उपलब्ध होऊ शकतो. कंपनी हा हँडसेट ब्लॅक, ग्रीन आणि सिल्व्हर कलर्समध्ये सादर करू शकते.