यूपीएससी अंतर्गत इंजिनीअर्स साठी पदभरती! जाणून घ्या काय आहेत नोकरीचे निकष..

केंद्रीय लोकसेवा आयोगा (Union Public Service Commission) अंतर्गत इंजिनियरिंग केलेल्या उमेदवारांसाठी ‘इंजिनीअरिंग सेवा पूर्व परीक्षा २०२३’ (Engineering Services Exam) आयोजित केली जाते. याद्वारे परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना शासनाच्या विविध पदांवर नियुक्त केले जाते. नुकतीच या भरती बाबतची अधिसूचना जाहीर करण्यात आली असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत.

या भरती अंतर्गत विविध विभागांच्या इंजिनियर पदाच्या एकूण १६७ जागा भरल्या जाणार आहेत. या पदांसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया ७ सप्टेंबर पासून सुरू झाली असून २६ सप्टेंबर २०२३ ही शेवटची तारीख आहे. ‘इंजिनीअरिंग सेवा पूर्व परीक्षा २०२३’ भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, नोकरीचे ठिकाण आणि अर्ज प्रक्रिया पुढीलप्रमाणे…

केंद्रीय लोकसेवा आयोग इंजीनियरिंग सेवा पूर्व परीक्षा २०२३ अंतर्गत भरली जाणारी पदे आणि पदसंख्या:

सिव्हिल इंजिनिअरिंग (श्रेणी I)
मेकॅनिकल इंजिनिअरिंग (श्रेणी II)
इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग (श्रेणी III)
इलेक्ट्रॉनिक्स आणि टेली कम्युनिकेशन इंजिनिअरिंग (श्रेणी IV)
एकूण रिक्त पदे – १६७

(वाचा: Indian Coast Guard Mumbai Recruitment 2023: भारतीय तटरक्षक दलाच्या मुंबई विभागात ‘या’ पदांसाठी भरती; आजच करा अर्ज)

शैक्षणिक पात्रता: संबंधित विषयात इंजिनीअरिंग पदवी आवश्यक.

वयोमर्यादा: खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी किमान २१ ते कमाल ३० वर्षे. ओबीसी प्रवर्गाला कमाल वयोमार्यादेत ३ वर्षांची सूट तर मागासवर्गीय प्रवर्गाला ५ वर्षांची सूट देण्यात आली आहे..

अर्जाचे शुल्क: खुला आणि ओबीसी प्रवर्गाला २०० रुपये शुल्क आकरण्यात आले आहे तर मागासवर्गीय प्रवर्ग आणि महिला यांना अर्ज शुल्क माफ आहे.

नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत.

भरतीचे सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी अधिकृत बेवसाईट: https://upsc.gov.in/

अर्ज करण्यासाठी //www.upsconline.nic.in या लिंकला भेट द्यावी.

तसेच परीक्षेचे तपशील आणि अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी https://drive.google.com/file/d/1YjoJEMtstSjXYOoG77n0uOihLmGwpkzZ/view या लिंक क्लिक करून तुम्ही सविस्तर अधिसूचना वाचू शकता.

अर्ज करण्याची शेवटची तारीख: २६ सप्टेंबर २०२३

(वाचा: NCB Recruitment 2023: ‘नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो’मध्ये इंटेलिजन्स ऑफिसर पदासाठी भरती! आजच करा अर्ज..)

Source link

ESE Recruitment 2023government job newsjob for engineersUPSC ESE RECRUITMENTUPSC ESE Recruitment 2023UPSC examupsc jobsUPSC Recruitment 2023upsc.gov.invacancy for engineers
Comments (0)
Add Comment