राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी शाळांबाबत एक निर्णय घेतला होता, ज्यामधे ० ते २० पटसंख्या असणाऱ्या शाळा बंद करण्यात येणार असल्याचे म्हटले होते. आता त्या निर्णयाच्या अंमलबजावणीला वेग आला. सातारा जिल्ह्यातील या शाळा बंद करण्याच्या हालचाली सुरु झाल्या असून जिल्ह्यातील वीस हून कमी पटसंख्या असणाऱ्या शाळा आणि शिक्षकांची माहिती संकलन करण्याचे काम सुरू झाले आहे.
राज्यात वीस पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा लवकरच बंद करण्याच्या घाट राज्य शासनाने घातला आहे. तसे झाल्यास येत्या काळात सातारा जिल्ह्यातील ६२४ शाळा बंद होण्याची चिन्हे आहेत. सातार्यामध्ये ग्रामीण आणि दुर्गम भगत अशा ६२४ शाळा आहेत ज्यामधे २० हून कमी विद्यार्थी शिकत आहेत. या शाळा बंद झाल्यास विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची मोठी अडचण निर्माण होणार आहे.
याचा मोठा फटका दुर्गम भागातील, खेड्या-पाड्यातील, आदिवासी भागातील तसेच दूरच्या वस्तीवरील विद्यार्थ्यांना बसणार आहे. ग्रामीण भागातील शाळा विद्यार्थी संख्येअभावी अशा बंद झाल्या तर जे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत तेही शिक्षणापासून दुरावतील. त्यामुळे राज्य सरकारच्या या निर्णयाला पालक आणि शिक्षण वर्गाकडून विरोध दर्शवला जात आहे.
(वाचा: UPSC ESE Recruitment 2023: यूपीएससी अंतर्गत इंजिनीअर्स साठी पदभरती! जाणून घ्या काय आहेत नोकरीचे निकष..)
शाळांची आकडेवारी…
सातारा जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या एकूण ३०२५ शाळा आहेत. त्यातील ६११ शाळांमध्ये २० हून कमी पटसंख्या आहे. याचबरोबर खासगी अनुदानित एक शाळा आहे. बारा शाळा स्वयंअर्थतत्त्वावर चालणाऱ्या आहेत. अशा २० पटसंख्याहून कमी असणाऱ्या एकूण ६२४ शाळा सातारा जिल्ह्यात आहेत.
हा निष्कर्ष चुकीचा…
केवळ विद्यार्थी संख्या कमी आहे म्हणून थेट शाळाच बंद करण्याचा निष्कर्ष काढणे हे अत्यंत चुकीचे असल्याचे जिल्ह्यातील शिक्षक आणि पालकांचे म्हणणे आहे. शासनाने यावर अन्य तोडगा काढून शाळा सुरू ठेवायला हव्या अशी मागणी होत आहे.
भत्ता दिला तरी…
शासनाकडून प्रायोगिक तत्त्वावर वीसहून कमी पटसंख्या असणाऱ्या चार ते पाच शाळांचे एकाच शाळेत समायोजन करण्याच्या हालचाली सुरू आहेत. चार ते पाच शाळांचे एकत्र समायोजन करून नेमलेल्या शाळेत विद्यार्थ्यांना पोचविण्याची सोय पालकांनी करावयाची असल्याचे शासनाने संगितले आहे. त्यासाठी शासनाकडून भत्ता देखील पालकांना दिला जाणार आहे. परंतुग्रामीण आणि दुर्गम भागातील परिस्थिती शहरांपेक्षा वेगळी असल्याने हे पालकांना जमेल का, किंवा खेड्या पाड्यातून विद्यार्थी या शाळेत कसे पोहोचतील, अशीही समस्या इथल्या पालकांपुढे आहे.
(वाचा: NCB Recruitment 2023: ‘नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो’मध्ये इंटेलिजन्स ऑफिसर पदासाठी भरती! आजच करा अर्ज.. )