Chandrayaan 3 च्या यशाला टेक्नोचा सलाम; खास डिजाईनसह लाँच केला स्मार्टफोन, किंमत फक्त ११,९९९ रुपये

टेक ब्रँड टेक्नोनं भारताच्या चंद्रयान ३ मिशनच्या यशाला ट्रिब्यूट देत नवीन मोबाइल फोन TECNO Spark 10 Pro Moon Explorer Edition लाँच केला आहे. ह्या स्पेशल एडिशनची किंमत फक्त ११,९९९ रुपये आहे जी येत्या १५ सप्टेंबरपासून देशात सेलसाठी उपलब्ध होईल. ह्या फोनच्या डिजाइन आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती पुढे वाचता येईल.

Tecno Spark 10 Pro Moon Explorer ची खास डिजाईन

ह्या स्पेशल एडिशन स्मार्टफोनमध्ये ड्युअल-टोन बॅक पॅनल देण्यात आला आहे. ज्यात वरच्या बाजूला सफेद रंग आहे तर खालच्या बाजूला ब्लॅक कलर आहे. वरच्या बाजूला डावीकडे रियर कॅमेरा सेटअप आहे जो चंद्रावरील सफेद जमिनीवरील काळ्या क्रेटर्स सारखा वाटतो. फोनच्या बॅकपॅनलवर इको फ्रेंडली लेदरचा वापर करण्यात आला आहे. कंपनीनं हा फोन मॉडेलला भारताच्या चंद्रयान ३ मिशनला समर्पित केला आहे.

वाचा: जबरदस्त! १० हजारांच्या आत 5G Phone; चीनी कंपनीनं केली कमाल

Tecno Spark 10 Pro Moon Explorer चे स्पेसिफिकेशन्स

नवीन टेक्नो फोन ६.७८ इंचाच्या फुलएचडी+ पंच-होल डिस्प्लेसह लाँच झाला आहे. जो १०८० x २४६० पिक्सल रिजोल्यूशन, ९०हर्ट्झ रिफ्रेश रेट, २७०हर्ट्झ टच सॅम्पलिंग रेट आणि ५८०निट्स ब्राइटनेसला सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी टेक्नो स्पार्क १० प्रो मून इक्स्प्लोरर एडिशन मध्ये ५,०००एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे जी १८वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करते.

हा फोन अँड्रॉइड १३ आधारित हायओएस १२.६ वर चालतो. प्रोससिंगसाठी स्मार्टफोन मीडियाटेक हीलियो जी८८ ऑक्टाकोर प्रोसेसरचा सपोर्ट देण्यात आला आहे जो २.०गीगाहर्ट्झ क्लॉक स्पीडवर चालतो. हा फोन गेम टर्बो ड्युअल इंजिन टेक्नॉलॉजीसह येतो.

TECNO Spark 10 Pro Moon Explorer Edition मेमरी फ्यूजन टेक्नॉलॉजीला सपोर्ट करतो त्यामुळे फोनच्या ८जीबी फिजिकल रॅमसह ८जीबी वचुर्अल रॅम जोडून १६जीबी रॅमची पावर मिळवता येते. तसेच भारतात हा १२८जीबी स्टोरेजसह विकत घेता येईल.

वाचा: १२ जीबी रॅम, १२० वॉट फास्ट चार्जिंग असलेल्या फोनवर मोठा डिस्काउंट; iQOO Neo 7 5G ची किंमत झाली कमी

फोटोग्राफीसाठी नवीन टेक्नो स्पार्क १० प्रो मध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात ५० मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा ३२ मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Source link

Chandrayaan 3tecno spark 10 protecno spark 10 pro moon explorerचांद्रयान ३टेक्नो
Comments (0)
Add Comment