भारत डायनॅमिक्स लिमिटेड (BDL) च्या या भरती प्रक्रियेत देशभरातील औरंगाबाद, हैदराबाद, दिल्ली येथील युनिट ऑफिसेसाठी ४५ ट्रेनी आणि ज्युनिअर ऑफिसर पदांची भरती केली जाणार आहे. या पदांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. या भारतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा असून २० सप्टेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. या भरतीतील पदांचे तपशील आणि अर्ज करण्याची प्रक्रिया पुढीलप्रमाणे….
‘बीडीएल’ भरती प्रक्रियेतील पदे आणि पदसंख्या:
मॅनेजमेंट ट्रेनी (इलेक्ट्रॉनिक्स) ग्रेड- II – १५ जागा
मॅनेजमेंट ट्रेनी (इलेक्ट्रिकल) ग्रेड- II – १२ जागा
मॅनेजमेंट ट्रेनी (इलेक्ट्रिकल) – ४ जागा
मॅनेजमेंट ट्रेनी (कॉम्प्युटर सायन्स) ग्रेड II – १ जागा
मॅनेजमेंट ट्रेनी (सायबर सिक्युरिटी) ग्रेड- II – २ जागा
मॅनेजमेंट ट्रेनी (केमिकल) ग्रेड II – २ जागा
मॅनेजमेंट ट्रेनी (सिव्हील) – २ जागा
मॅनेजमेंट ट्रेनी (बिझनेस डेव्हलपमेंट) ग्रेड II – १ जागा
मॅनेजमेंट ट्रेनी (ऑप्टिक्स) ग्रेड II – १ जागा
मॅनेजमेंट ट्रेनी (फिनान्स) ग्रेड II – २ जागा
वेल्फेअर ऑफिसर ग्रेड I – २ जागा
JM (पब्लिक रिलेशन्स) ग्रेड I – १ जागा
एकूण रिक्त जागा – ४५
(वाचा: NCB Recruitment 2023: ‘नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो’मध्ये इंटेलिजन्स ऑफिसर पदासाठी भरती! आजच करा अर्ज..)
पात्रता: या भरती प्रक्रियेतील सर्व पदांच्या शैक्षणिक पात्रता वेगळ्या आहेत. पात्रतेचे सविस्तर तपशील भरतीच्या अभिसूचनेत नमूद करण्यात आले आहेत. अधिसूचनेची लिंक खाली दिलेली आहे.
वयोमर्यादा: २७ जुलै २०२३ पर्यंत ‘ग्रेड II’ मधील पदांसाठी कमाल वयोमर्यादा २७ वर्षे तर ‘ग्रेड I’ मधील पदांसाठी २८ वर्षे आहे. कमाल वयोमर्यदेत इमाव प्रवर्गाला ३ वर्षे, अजा/ अज प्रवर्गाला ५ वर्षे तर दिव्यांगांना १० वर्षे सूट देण्यात आली आहे.
वेतन श्रेणी:
ग्रेड- II पदांसाठी ४० हजार ते १ लाख ४० हजार
ग्रेड- I पदांसाठी ३० हजार ते १ लाख २० हजार
निवड पद्धती: मॅनेजमेंट ट्रेनी पदांसाठी लेखी परीक्षा आणि इंटरह्यू घेऊन निवड केली जाईल. लेखी परीक्षा कॉम्प्युटर बेस्ड ऑनलाइन असेल. त्या परीक्षेत पात्र झाल्यास मुलखातीसाठी बोलवले जाईल. लेखी परीक्षा मुंबई, भोपाळ, बेंगलुरू, हैदराबाद य केंद्रांवर डिसेंबर २०२३/ जानेवारी २०२४ या दरम्यान घेतली जाईल. तर ‘ग्रेड I’ मधील पदांसाठी निवड लेखी परीक्षेतील गुणवत्तेनुसार केली जाईल. सर्वात महत्वाचे म्हणजे वेल्फेअर ऑफिसर पदासाठी उमेदवारांना तेलगू प्रोफिशियन्सी टेस्ट द्यावी लागेल.
अर्ज शुल्क: या भरतीसाठी ५०० रुपये अर्ज शुल्क आकारण्यात आले आहे तर राखीव प्रवर्गाला शुल्क माफ आहे.
या भरती प्रक्रियेबाबत काही शंका असल्यास समाधानासाठी bdl-recruitment@bdl-india.in. या ई-मेल आयडी वर संपर्क साधावा,
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ‘बीडीएल’चे https://bdl-india.in हे अधिकृत संकेतस्थळ आहे.
या भरतीची सविस्तर अधिसूचना वाचण्यासाठी https://i-register.co.in/sagarreg23/Documents/BDL%20Advt%202023-5.pdf या लिंकवर क्लिक करावे.
(वाचा: Indian Coast Guard Mumbai Recruitment 2023: भारतीय तटरक्षक दलाच्या मुंबई विभागात ‘या’ पदांसाठी भरती; आजच करा अर्ज )