स्मार्टफोनमध्ये 5G कसे ऑन कराल य़
Google Pixel किंवा स्टॉक Android फोनमध्ये सर्वप्रथम Settings वर जा. नंतर नेटवर्क आणि इंटरनेट वर जा आणि सिम वर जा. नंतर पसंतीचे नेटवर्क प्रकार निवडा आणि त्यानंतर 5G निवडा. तुमचा कोणता फोन आहे त्यानुसार तुम्ही ही सेटिंग करु शकता…
सॅमसंग फोन असेल तर सेटिंग्ज वर जा आणि कनेक्शन वर जा. त्यानंतर मोबाइल नेटवर्क निवडा. यानंतर, नेटवर्क मोडवर जा आणि 5G/LTE/3G/2G (ऑटोकनेक्ट) निवडा.
वनप्लस फोन असेल तर सेटिंग्ज वर जा. त्यानंतर वाय-फाय आणि नेटवर्कवर जा आणि सिम आणि नेटवर्कवर टॅप करा. यानंतर Preferred network type वर जा आणि 2G/3G/4G/5G (ऑटोमेटिक) निवडा.
Oppo फोन असेल तर देखील सर्व प्रथम सेटिंगमध्ये जा. त्यानंतर कनेक्शन आणि शेअरिंग वर जा. यानंतर सिम 1 किंवा सिम 2 वर टॅप करा. नंतर Preferred network type वर जा आणि सिलेक्ट 2G/3G/4G/5G (ऑटोमेटिक) निवडा.
Realme फोन असेल तर सर्व प्रथम सेटिंगमध्ये जा. त्यानंतर कनेक्शन आणि शेअरिंग वर जा. यानंतर सिम 1 किंवा सिम 2 वर टॅप करा. नंतर Preferred network type वर जा आणि सिलेक्ट 2G/3G/4G/5G (ऑटोमेटिक) निवडा.
Vivo किंवा iQoo फोन असेल तर सेटिंग्ज वर जा. नंतर SIM 1 किंवा SIM 2 वर टॅप करा. त्यानंतर मोबाईल नेटवर्कवर जा. नेटवर्क मोडवर जा आणि 5G मोड निवडा.
Xiaomi किंवा Poco फोन असेल तर देखील सर्वप्रथम Settings वर जा. त्यानंतर सिम कार्ड आणि मोबाईल नेटवर्कवर टॅप करा. त्यानंतर Preferred network type वर जा आणि 5G वर टॅप करा.
वाचा : घरचा फ्रीज जास्त काळ टिकवायचा आहे? ‘या’ चुका करणं टाळा!