OPPO A38 ची किंमत
ओप्पोचा नवीन स्मार्टफोन ४जीबी रॅम व १२८जीबी स्टोरेज मिळते. फोनची विक्री १२,९९९ रुपयांमध्ये १३ सप्टेंबरपासून सुरु होईल. कंपनीनं हा फोन ग्लोइंग गोल्ड आणि ग्लोइंग ब्लॅक अशा दोन कलर ऑप्शनमध्ये सादर केला आहे. लाँच ऑफर अंतर्गत काही निवडक बँकच्या ग्राहकांना १० टक्के इंस्टंट डिस्काउंट मिळेल. तसेच नो कॉस्ट ईएमआयचा ऑप्शन देखील मिळेल.
वाचा: विमानात Airplane Mode ऑन करणे का गरजेचं आहे? कारण वाचून थक्क व्हाल
Oppo A38 चे स्पेसिफिकेशन्स
OPPO A38 मध्ये ६.५६ इंचाचा एचडी प्लस आयपीएस एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा वॉटर ड्रॉप डिजाईन असलेला फोन ७२० x १६१२ पिक्सल रिजॉल्यूशन, ९० हर्ट्झ रिफ्रेश रेट, ७२० निट्झ पीक ब्राइटनेस, १०० टक्के DCI P3 आणि १००% एसआरजीबी कलर गमटच्या सपोर्टसह सादर करण्यात आला आहे.
फोनमध्ये कंपनीनं हेलिओ जी८५ चिपसेटची पावर दिली आहे. तर ग्राफिक्ससाठी माली जी५२ एमसी२ जीपीयू आहे. त्याचबरोबर ४जीबी रॅम आणि १२८जीबी पर्यंत स्टोरेज मिळते. रॅम वाढवण्यासाठी ४GB एक्सटेंडेड रॅमचा सपोर्ट आणि इंटरनल स्टोरेज वाढवण्यासाठी मायक्रो एसडी कार्ड स्लॉट मिळतो.
Oppo A38 मध्ये ५०००एमएएचची बॅटरी मिळते जी ३३वॉट सुपरवूक चार्जिंगला सपोर्ट करतो. फोनमध्ये अँड्रॉइड १३ आधारित कलरओएस १३.१ ऑपरेटिंग सिस्टम देण्यात आली आहे. हा डिवाइस ४जी, वाय-फाय, जीपीएस, यूएसबी टाइप पोर्ट, ३.५मिमी हेडफोन जॅक, साइड फेसिंग फिंगरप्रिंट सेन्सर सारख्या फीचर्ससह सादर झाला आहे.
वाचा:
नव्या ओप्पो फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यात ५० मेगापिक्सलची प्रायमरी कॅमेरा लेन्स ऑटो फोकस सपोर्टसह मिळते. त्याचबरोबर २ मेगापिक्सलची पोर्ट्रेट लेन्स आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो.