पदभरतीचा तपशील :
संस्था : बँक ऑफ बडोदा फायनान्शियल सोल्यूशन लिमिटेड, मुंबई
कामाचे ठिकाण : भारतात कुठेही
एकूण जागा : २०
पदाचे नाव : प्रादेशिक संबंध अधिकारी / उपप्रादेशिक संबंध अधिकारी (Regional Relationship Officer आणि Deputy Regional Relationship Officer)
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : १४ सप्टेंबर २०२३
वयोमार्यादा : ४५ वर्षे
(वाचा : HPCL Recruitment 2023: हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये ३७ जागांसाठी भरती; आजच करा अर्ज)
शैक्षणिक पात्रता :
- प्रादेशिक संबंध अधिकारी / उपप्रादेशिक संबंध अधिकारी या पडनसाठी अर्ज करणारा उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवीधर असणे आवशयक आहे.
- शिवाय, पदव्युत्तर शिक्षण झालेले असणार्या उमेदवारांना किमान एक वर्षाचा Retail Assets and Credit Cards विभागातील किमान एक वर्ष कामाचा अनुभव असणे गरजेचे आहे.
- तर, पदवीधरांना Retail Assets and Credit Cards विभागातील किमान तीन वर्ष कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
महत्त्वाचे :
१. अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निवड झालेल्या उमेदवारांना बीओबीच्या वतीने फोन करून कळवण्यात येईल.
२. निवड प्रक्रियेचे संपूर्ण हक्क संस्थेकडून असून, निवड प्रक्रियेच्या कोणत्याही पातळीवर उमेदवारांना निवड प्रक्रियेतून बाहेर काढण्याचे हक्क संस्थेला असतील.
३. सदर भरती प्रक्रियेतील कोणताही बदल संस्थेच्या अधिकृत वेबसाइटच्या माध्यमातून कळवळा जाईल.
असा करा अर्ज :
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना www.bobfinancial.com संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
3. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी मूळ जाहीरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. .
महत्त्वाच्या लिंक्स :
बँक ऑफ बडोदा फायनान्शियल सोल्यूशन लिमिटेडमधील मूळ जाहीरात पहाण्यासाठी येथे क्लिक करा.
बँक ऑफ बडोदा फायनान्शियल सोल्यूशन लिमिटेडमधील जागांवर अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
(वाचा : Panvel Corporation मध्ये वैद्यकीय आणि आरोग्य विभागात भरती; थेट मुलाखतीतून भरली जाणार ५४ पदे)