नवी दिल्ली : Apple MacBook घ्यायची इच्छा आहे? पण किंमतीमुळे परवडत नाही? अशीच तुमची स्थिती असेल तर आजची बातमी तुमच्यासाठीच आहे. गुगलच्या क्रोमबुक आणि अनेक एन्ट्री-लेव्हल विंडोज लॅपटॉपला टक्कर देण्यासाठी अॅपल कंपनी लवकरच स्वस्त लॅपटॉप लाँच करू शकते, असा दावा एका अहवालात करण्यात आला आहे. असे म्हटले जात आहे की या मॅकबुकची घोषणा २०२४ मध्ये केली जाऊ शकते. आत्तापर्यंत Apple मॅकबुक ८० हजार रुपयांपासून सुरुवातीची किंमत असलेले लॅपटॉप पुरवते. अशा परिस्थितीत हा नवा लॅपटॉप हा परवडणारा मॅकबुक असू शकतो.
Apple MacBook ची किंमत काय असू शकते?
फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनवर उपलब्ध असलेल्या क्रोमबुकची किंमत पाहिली तर त्यांची किंमत ३०,००० रुपयांपेक्षा कमी आहे. अशा परिस्थितीत अॅपल ३० हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत मॅकबुक लाँच करू शकते का? जर कंपनीला क्रोमबुक सेगमेंटला टार्गेट करायचे असेल तर ही किंमत ठेवावी लागेल. मात्र Apple MacBook च्या किंमतीबाबत कंपनीने अधिकृतपणे माहिती दिलेली नाही. Apple ने याबद्दल अधिकृत माहिती दिलेली नाही. कारण लीकनुसार, बजेट Apple MacBook 2024 च्या उत्तरार्धात येईल. यात अजून वर्षभराहून अधिक कालावधी बाकी आहे.

Apple 15 मालिका होणार लाँच
Apple कंपनी १२ सप्टेंबर रोजी आपली १५ सीरीज लाँच करणार आहे. यादरम्यान, iPhone 15 आणि iPhone 15 Pro मॉडेल लाँच केले जातील. या फोन्समध्ये टेलिफोटो आणि अल्ट्रा-वाइड कॅमेरे दिले जाऊ शकतात. यासोबतच यात U2 अल्ट्रा-वाइडबँड चिप दिली जाऊ शकते. या मालिकेत A16 बायोनिक चिपसेट प्रदान करणे अपेक्षित आहे. तसेच, यावेळी डायनॅमिक आयलंड फीचर iPhone 15 आणि iPhone 15 Plus मध्ये देखील दिले जाऊ शकते. त्याच वेळी, असे देखील सांगितले जात आहे की iPhone 15 Pro Max मध्ये अल्ट्रा मॉडेल दिले जाणार नाही.
वाचा : इंटरनेट वापरताना ‘या’ ७ गोष्टींची घ्या काळजी, नाहीतर…