या निमित्ताने तब्बल १२ वर्षे रखडलेली सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची प्राध्यापक भरती अखेर मार्गी लागली आहे. नुकतेच विद्यापीठाने संलग्न महाविद्यालये आणि शिक्षण संस्थांना सहा महिन्याच्या आत प्राध्यापक भरतीचे आदेश दिले होते. आता विद्यापीठातील ४२ विभागांच्या प्राध्यापक पदाच्या रिक्त जागा सप्टेंबर अखेर भरती केल्या जाणार असल्याचे पुणे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार विद्यापीठाच्या विविध विभागांतील २१५ प्राध्यापकांच्या रिक्त पदांपैकी फक्त १११ प्राध्यापकांची भरती प्रक्रिया सप्टेंबर अखेर सुरू होणार आहे. परंतु पुणे विद्यापीठाला उशिरा जाग आल्याने शिक्षण क्षेत्रात याविषयी नाराजी देखील व्यक्त केली जात आहे. कारण गेली अनेक वर्षे ही भरती रखडल्याणे विद्यापीठाचे शिक्षणिक नुकसान झालेच शिवाय प्रतिष्ठेचा प्रश्नही निर्माण झाला होता.
(वाचा: सातारा जिल्ह्यातील ६०० हून अधिक शाळा बंद करण्यासाठी सरकारच्या हालचाली! ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे नुकसान..)
त्यामुळे विद्यापीठाने प्राध्यापक भरतीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे दिला होता. त्यानुसार शासनाने १११ पदांच्या भरतीला मान्यता दिली आहे. त्यामुळे आता सप्टेंबर अखेरीसच ही भरती प्रक्रिया सुरू होणार असल्याची चिन्हे आहेत.
राज्यातील विविध महाविद्यालयांमध्ये प्राध्यापकांची रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया केल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. शासनाने २ हजार ८८ पदे भरण्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार सर्व नियमांचे पालन करून प्राध्यापकांची रिक्त पदे भरली जात आहेत. यामध्ये आता पुणे विद्यापीठाने भरतीबाबत गंभीर भूमिका घेतली आहे.
पुणे विद्यापीठातील एकूण ४२ विभागांमध्ये एकूण २१५ प्राध्यापकांची पदे रिक्त आहेत. त्यापैकी काही महत्त्वाचे विभाग आणि त्यातील सहाय्यक प्राध्यापकांच्या जानेवारी २०२० पर्यंतच्या रिक्त पदांची यादी :
विभाग – एकूण पदे – रिक्त पदे
- भौतिकशास्त्र – ४० – २५
- रसायनशास्त्र – ४२ – २२
- संख्याशास्त्र – २० – १३
- इतिहास – ८ – ६
- मराठी – ७ – ४
- प्राणिशास्त्र – १८ – १०
- जैवतंत्रज्ञान – ६ – ५
एकूण ४२ विभाग – ३८४ – २१५
कुलसचिव म्हणतात…
विद्यापीठातील रिक्त पदांचे आरक्षण शासनाकडून तपासून घेण्यात आले आहे. विद्यापीठातील आरक्षण विभागाकडूनही त्याची तपासणी झाली आहे. आता विभागातील समांतर आरक्षण व इतर बाबींची पूर्तता करण्याचे काम सुरू आहे. लवकरच हे काम पूर्ण होईल आणि त्यानंतर तातडीने विद्यापीठांमधील प्राध्यापकांच्या रिक्त पदांची जाहिरात प्रसिद्ध केली जाईल. साधारण सप्टेंबर अखेरीस ही प्रक्रिया सुरू होईल.
– डॉ. प्रफुल्ल पवार, कुलसचिव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
(वाचा: MPSC PSI Bharti 2023: महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत पोलीस उपनिरीक्षक पदासाठी भरती! जाणून घ्या सविस्तर तपशील..)