Google Pixel Watch 2 भारतीय लाँच
Google India नं आपल्या ऑफिशियल एक्स अकाऊंटवरून पोस्ट करून Google Pixel Watch 2 भारतात लाँच होणार हे सांगितलं आहे. स्मार्टवॉच Made by Google इव्हेंटनंतर एक दिवसांनी म्हणजे ५ ऑक्टोबर, २०२३ पासून भारतात विक्रीसाठी उपलब्ध होईल. ट्वीटमध्ये टीजर व्हिडीओ देखील देण्यात आला आहे. हा देखील फोन्सप्रमाणे एक्सक्लूसिव्ह Flipkart वर उपलब्ध होईल. त्यामुळे वॉचच्या डिजाइनचा खुलासा झाला आहे.
हे देखील वाचा: Wings Platinum Smartwatch : एकदा करा चार्ज ७ दिवस टिकेल बॅटरी, फक्त १,४९९ रुपये आहे किंमत
याआधी कंपनीनं ट्वीट करून Pixel 8 Series ची प्री-ऑर्डरची माहिती दिली होती. फोन्स देखील ५ ऑक्टोबर, २०२३ पासून प्री-ऑर्डर करता येतील. फोन्सच्या प्री-ऑर्डरसह वॉचची विक्री भारतात सुरु होईल. कंपनीनं अद्याप आगामी वॉचची किंमत आणि स्पेसिफिकेशन सांगितले नाहीत. परंतु टीजर व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या वॉचची डिजाइन Pixel Watch सारखीच आहे.
हे देखील वाचा: चुकून फोटो-व्हिडीओ डिलीट झाले तर काळजी नको, दोन पद्धतीनं करा रिकव्हर
वॉचमध्ये मिळू शकतात हे फीचर्स
रिपोर्ट्सनुसार, आगामी पिक्सल वॉचमध्ये Qualcomm Snapdragon W5 series चा प्रोसेसर मिळेल, जो Snapdragon W5 या Snapdragon W5+ पैकी एक असू शकतो. तसेच स्मार्टवॉच Always on Display (AOD) फीचर इनेबल असेल तसेच २४ तासांपर्यंतचा बॅटरी लाइफ देऊ शकतं. हा Wear OS 4 वर चालेल. ह्यात नवीन वॉच फेस Accessible, Arc, Bold Digital आणि Analog Bold मिळतील. Google play Console लिस्टिंगनुसार वॉचमध्ये Qualcomm SW5100 प्रोसेसर मिळेल. वॉचच्या अचूक स्पेसिफिकेशन आणि किंमतीची माहिती लाँचच्या वेळी समजेल.