हायलाइट्स:
- सोलापूरातील रुग्णसंख्या घटली
- पाच तालुक्यात आजपासून अनलॉक
- काय सुरू, काय बंद राहणार? वाचा
सोलापूरः सोलापूर जिल्ह्यातील पाच तालुक्यात आजपासून अनलॉक होत आहेत. पंढरपूरसह, करमाळा, माढा, माळशिरस, सांगोला या तालुक्यात दहा दिवसांचा लॉकडाऊन करण्यात आला होता. करोना रुग्णांची संख्या अटोक्यात आल्यानंतर आज पाच तालुक्यात निर्बंध शिथिल करण्यात येत आहेत.
सोलापुरातील या पाच तालुक्यात रुग्णसंख्या वाढल्यानं जिल्हा प्रशासनाने १३ ऑगस्टपासून कठोर निर्बंध लागू केले होते. त्यानंतर १० दिवसांनंतर निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. या तालुक्यातील सर्व दुकानं दुपारी ४ पर्यंत सुरू राहणार आहेत. सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे.
वाचाःनिर्बंधाची हंडी फुटणार?; गोविंदा पथकांसोबत मुख्यमंत्र्याची बैठक
अत्यावश्यक सेवांची दुकाने ७ दिवस उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. दुपारी चार पर्यंत दुकानं सुरू राहणार आहे. तर, लग्नासाठी ५० जणांना तर, अंत्यसंस्कारांसाठी २० जणांना परवानगी देण्यात आली आहे.
वाचाः महाराष्ट्राला हादरवणारी घटना! भानामतीच्या संशयातून कुटुंबाला भरचौकात मारहाण
हॉटेल चालक व रेस्टॉरंटसाठी ५० टक्के क्षमतेने सुरू करण्यात येणार आहे. मात्र, पाच दिवसच हॉटेल व रेस्टॉरंट सुरू राहणार आहेत. सर्व खासगी कार्यालय उघडण्यासही परवानगी देण्यात आली आहे. सामाजिक आणि राजकीय मेळाव्यांना ५० टक्के उपस्थितीची परवानगी देण्यात आली आहे.
वाचाः ‘… नाहीतर जन आशीर्वादाच्या ‘जत्रा’ लोकांना गुंगीचा मंत्र देऊन पुढे जातील’