या भरतीसाठी इच्छूक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले असून ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. या पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वेतन, वयोमर्यादा आणि अर्ज कारण्याची पद्धती पुढीलप्रमाणे…
‘राष्ट्रीय तपास यंत्रणा भरती २०२३’ मधील रिक्त पदे आणि पदसंख्या…
उप विधी अधिकारी – ४ जागा
वरिष्ठ सरकारी वकील – ३ जागा
सरकारी वकील – ५ जागा
एकूण रिक्त जागा – १२
(वाचा: Professor Recruitment Pune 2023: महिना अखेरीस पुणे विद्यापीठात प्राध्यापक भरती..)
पदाचे नाव शैक्षणिक पात्रता:
उप विधी अधिकारी, वरिष्ठ सरकारी वकील, सरकारी वकील या पदांसाठी कायदा विषयातील पदवी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. या व्यतिरिक्त अन्य सविस्तर पात्रता जाणून घेण्यासाठी अधिसूचना वाचावी. ज्याची लिंक खालील मजकुरात दिलेली आहे.
वेतनश्रेणी:
उप विधी अधिकारी – ७८ हजार ८०० रुपये ते २ लाख ९ हजार २०० रुपये.
वरिष्ठ सरकारी वकील – ६७ हजार ७०० रुपये ते २ लाख ८ हजार ७०० रुपये.
सरकारी वकील – ५६ हजार १०० रुपये ते १ लाख ७७ हजार ५०० रुपये.
अर्ज पद्धती: ऑफलाईन
अधिकृत वेबसाईट: http://www.nia.gov.in
या भरतीसंदर्भात संपूर्ण अधिसूचना वाचण्यासाठी https://nia.gov.in/writereaddata/Portal/Recruitment/171_1_ForthepsotofDLASPPPP.pdf या लिंक वर क्लिक करा.
अर्ज सादर करण्याचा पत्ता: एसपी (एडमिन) नॅशनल इन्वेस्टीगेशन एजन्सी मुख्यालय, सीजीओ कॉम्प्लेक्स, लोधी रोड, नवी दिल्ली – ११०००३
अर्ज करण्याची शेवटची तारीख: ९ ऑक्टोबर २०२३
(वाचा: MPSC PSI Bharti 2023: महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत पोलीस उपनिरीक्षक पदासाठी भरती! जाणून घ्या सविस्तर तपशील..)