आता छोटी कंपनी भिडणार सॅमसंगशी; Tecno Phantom V Flip ची लाँच डेट आली समोर

चिनी स्मार्टफोन मेकर Tecno चा Phantom V Flip २२ सप्टेंबरला सिंगापूरमध्ये होणाऱ्या कंपनीच्या इव्हेंटमध्ये लाँच केला जाईल. ह्या स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्सची जास्त माहिती मिळाली नाही. हा कंपनीचा पहिला फ्लिप स्मार्टफोन असेल जो Tecno Megabook T1 च्या नव्या व्हर्जनसह लाँच केला जाईल.

ह्या स्मार्टफोनचा कव्हर चिनी ई-कॉमर्स कंपनी Alibaba वर लिस्टेड आहे, ज्यामुळे ह्याची डिजाइन समजली आहे. ह्यात बाहेरील कव्हरवर एक वर्तुळाकार डिस्प्ले आहे. कंपनीनं ह्या स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्स खुलासा केला नाही.परंतु लिक्सनुसार, दोन रियर कॅमेरे आणि सेकंडरी स्क्रीनच्या बाजूला एक LED फ्लॅश असू शकतो.

हे देखील वाचा: ‘जवान’ चित्रपटात शाहरुख खाननं वापरला ‘हा’ फोन, ब्रँड पाहून लोक झाले थक्क

Tecno Phantom V Flip गुगल प्ले कंसोल वेबसाइटवर देखील दिसला आहे. ह्या लिस्टिंगमधून फोनच्या ८जीबी रॅम असेल, असं समजलं आहे. हा अँड्रॉइड १३ वर चालू शकतो. तसेच ह्यात MediaTek Dimensity 1300 चिपसेट मिळू शकतो. फोनमध्ये एचडी+ डिस्प्ले मिळेल जो १,०८० × २,६४० पिक्सल रिजॉल्यूशन आणि ४८० पीपीआय पिक्सल डेंसिटीसह येऊ शकतो. ह्यात ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, १३ मेगापिक्सलचा सेकंडरी सेन्सर आणि ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो. जोडीला ४,००० एमएएचची बॅटरी ४५ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह मिळू शकते.

हे देखील वाचा: रियलमीचा नवा 5G Phone १५ हजारांच्या बजेटमध्ये शाओमी आणि सॅमसंग समोर टिकतो का? चला पाहूया

चांद्रयान ३ ला टेक्नोचा सलाम

चंद्रयान ३ च्या यशाला ट्रिब्यूट म्हणून Tecno नं स्पार्क १० प्रो मून एक्सप्लोरर एडिशन लाँच केला होता. हा मार्च मध्ये लाँच केलेल्या Tecno Spark १० Pro चा स्पेशल व्हर्जन आहे. ह्यात प्रोसेसर म्हणून MediaTek Helio G88 चिपसेट देण्यात आहे. ह्या स्‍मार्टफोनमध्ये ६.७८ इंचाचा फुल एचडी प्‍लस डॉट इन डिस्‍प्‍ले ९० हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि २७० हर्ट्झ टच सॅम्पलिंग रेटसह आला आहे. ह्यात ५० मेगापिक्सलचा ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. Tecno Spark 10 Pro मून एक्सप्लोरर एडिशनची किंमत ११,९९९ रुपये आहे. जोडीला १६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज मिळेल.

Source link

phantom v flipTecnotecno foldable phonetecno phantom v fliptecno phantom v flip launch dateटेक्नोटेक्नो फँटम फ्लिप
Comments (0)
Add Comment