स्वदेशी कंपनीची कमाल! १६जीबी रॅम आणि २५६जीबी स्टोरेजसह Lava Blaze 2 Pro लाँच

स्वदेशी कंपनी लावानं भारतीय ग्राहकांसाठी नवा डिवाइस Lava Blaze 2 Pro बाजारात आणला आहे. सध्या ह्या फोनची किंमत कंपनीनं सांगितली नाही परंतु सर्व स्पेसिफिकेशन ऑफिशियल वेबसाइटवर शेयर करण्यात आले आहेत. चला जाणून घेऊया सर्व फीचर्स, संभाव्य किंमत आणि स्पेसिफिकेशन्स.

Lava Blaze 2 Pro चे स्पेसिफिकेशन्स

Lava Blaze 2 Pro मध्ये ६.५ इंचाचा एचडी प्लस आयपीएस २.५ डी कर्व डिस्प्ले देण्यात आला आहे. जो ९० हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि ७२० x १६०० पिक्सल रिजॉल्यूशनला सपोर्ट करतो. इतकेच नव्हे तर स्क्रीनवर २६९ पीपीआय डेंसिटी आणि १६.७ मिलियन कलर्सचा सपोर्ट आहे.

वाचा: अजून एक स्वस्त 5G Phone घेऊन येतेय Samsung; Galaxy A25 5G गीकबेंचवर लिस्ट

हा डिवाइस अँड्रॉइड १२ वर चालतो. ह्यात कंपनीनं UNISOC T616 ऑक्टा कोर प्रोसेसरचा वापर केला आहे. जोडीला ८जीबी रॅम + ८जीबी व्हर्च्युअल रॅमचा सपोर्ट मिळतो. एकूण १६जीबी पर्यंत रॅमचा वापर करता येईल. त्याचबरोबर कंपनी २५६ जीबी पर्यंतची इंटरनल स्टोरेज मिळते.

Lava Blaze 2 Pro फोनमध्ये एलईडी फ्लॅशसह ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो, ज्यात ५० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा लेन्स आणि दोन २ मेगापिक्सलचा आणखी एक लेन्स मिळते. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो.

स्मार्टफोनमध्ये ५०००एमएएचची मोठी बॅटरी, १८वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह देण्यात आला आहे. कंपनीचा दावा आहे की ही बॅटरी ३२ तासांचा स्टँडबाय टाइम देते. कनेक्टिव्हिटीसाठी ड्युअल सिम ४जी, वाय-फाय, ब्लूटूथ, ३.५ हेडफोन जॅक, साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर असे फीचर्स मिळतात.

वाचा: चुकून फोटो-व्हिडीओ डिलीट झाले तर काळजी नको, दोन पद्धतीनं करा रिकव्हर

Lava Blaze 2 Pro ची किंमत

कंपनीनं आतापर्यंत किंमत सांगितली नाही परंतु Lava Blaze 2 Pro १२८ जीबी आणि २५६जीबी सारख्या दोन स्टोरेज ऑप्शनमध्ये येईल. मीडिया रिपोर्टनुसार ह्याचा बेस मॉडेल ९,९९९ रुपयांमध्ये लाँच होऊ शकतो. तर टॉप मॉडेलची १२,९९९ रुपये ठेवली जाऊ शकते. अधिकृत किंमत लवकरच घोषित केली जाऊ शकते.

Source link

lavalava blaze 2 5glava blaze 2 prolava mobilelava yuva 2 prolava yuva 2 pro priceyuva 2 pro
Comments (0)
Add Comment