Nokia G42 5G ची किंमत
नोकिया जी४२ ५जी फोन १२,५९९ रुपयांमध्ये भारतात लाँच करण्यात आला आहे. ह्या फोनमध्ये ६ जीबी रॅम देण्यात आला, सोबतीला ५जीबी वचुर्अल रॅम टेक्नॉलॉजी मिळते. ही टेक्नॉलॉजी फिजिकल रॅम आणि वचुर्अल रॅम मिळून फोन ११जीबी रॅम पर्यंतची पावर देते. Nokia G42 5G फोन १५ सप्टेंबरपासून अॅमेझॉनवर सेलसाठी उपलब्ध होईल.
वाचा: …म्हणून चीनने घातली iPhone वर बंदी; अॅप्पलच्या अडचणीत वाढ
Nokia G42 5G चे स्पेसिफिकेशन्स
नोकिया जी४२ ५जी फोनमध्ये ६.५६ इंचाचा एचडी+ वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले देण्यात आला आहे. ही एलसीडी स्क्रीन ९०हर्ट्झ रिफ्रेश रेटला सपोर्ट करते. सिक्योरिटीसाठी कंपनीनं साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर दिला आहे. तसेच ५जी आणि ४जीसह ओझो ऑडिओ प्लेबॅक, वाय-फाय आणि ब्लूटूथ सारखे कनेक्टिव्हिटी ऑप्शन मिळतात.
हा मोबाइल फोन अँड्रॉइड १३ ओएसवर लाँच झाला आहे. प्रोसेसिंगसाठी ह्यात २.२गीगाहर्ट्झ क्लॉक स्पीड असलेला क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ४८० प्लस ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. जोडीला ६जीबी + ५जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज आहे.
वाचा: अजून एक स्वस्त 5G Phone घेऊन येतेय Samsung; Galaxy A25 5G गीकबेंचवर लिस्ट
फोटोग्राफीसाठी Nokia G42 5G ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो ज्यात ५० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, २ मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आहे. तसेच फ्रंट पॅनलवर ८ मेगापिक्सलचा सेल्फी सेन्सर आहे. पावर बॅकअपसाठी नोकिया जी४२ ५जी फोन ५,०००एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो. ही बॅटरी २०वॉट फास्ट चार्जिंगनं चार्ज करता येते.