Bloomberg च्या रिपोर्टनुसार Apple Watch Series 9 दोन व्हेरिएंट्समध्ये येऊ शकतात. ह्यात ४२मिमी आणि ४५मिमी डिस्प्ले साइजचा समावेश आहे. Apple Watch Ultra कंपनी ४९मिमी स्क्रीन साइजसह सादर करू शकते. लीक रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की हे स्मार्टवॉच आधीपेक्षा चांगल्या हार्ट रेट सेन्सरसह बाजारात येतील.
कंपनी ह्यात नवीन ऑप्टिकल हार्ट रेट सेन्सर देईल. हा सेन्सर जुन्या मॉडेलच्या तुलनेत चांगला आणि अचूक हार्ट रेटची माहिती देईल. विशेष म्हणजे अॅप्पल कंपनीनं गेल्यावर्षी लाँच केलेल्या Watch Series 8 सीरीज आणि अल्ट्रा मध्ये थर्ड-जनरेशन हार्ट रेट सेन्सर देण्यात आला होता. हार्ट रेट सेन्सर व्यतिरिक्त, ह्या स्मार्टवॉचमध्ये अनेक अन्य नवीन सेन्सर व अपग्रेड्स मिळू शकतात.
रिपोर्टनुसार, अॅप्पल वॉच सीरीज ९ आणि अॅप्पल वॉच अल्ट्राच्या लुकमध्ये जास्त बदल केला जाणार नाही. डिस्प्ले बद्दल सांगण्यात आले आहे की अॅप्पल सीरीज ९ मध्ये ४२मिमी आणि ४५मिमी च्या दोन स्क्रीन साइज मिळतील, तर अल्ट्रा व्हेरिएंट ४९मिमी डिस्प्लेसह येईल. त्याचबरोबर वॉच U2 ultrawide-band चिपसह लाँच होऊ शकते.
Apple ‘Wonderlust’ लाँच इव्हेंट
Apple ‘Wonderlust’ लाँच इव्हेंट १२ सप्टेंबर मंगळवारी आयोजित केला जाईल. ह्या इव्हेंटची सुरुवात भारतीय वेळेनुसार रात्री १०.३० वाजता होईल. हा इव्हेंट तुम्ही अॅप्पलच्या अधिकृत Youtube चॅनेल व सोशल मीडिया चॅनेल्सवर लाइव्ह पाहता येईल. ह्या इव्हेंटमधून कंपनी नेक्स्ट जनरेशन iPhone 15 Series, Apple Watch Series 9, Apple Watch Ultra, AirPods Pro इत्यादी प्रोडक्ट्स लाँच करू शकते.