‘सशस्त्र सीमा बल’मध्ये इंजिनीअर्स साठी भरती! जाणून घ्या कसा करायचा अर्ज..

भारतीय सैन्य दलात काम करण्याची इच्छा असेल आणि भरतीची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. ‘एसएसबी’ म्हणजेच (SSB Recruitment 2023) ‘सशस्त्र सीमा बल’ या केंद्र सरकारच्या गृह खात्या अंतर्गत येणार्‍या विभागात ‘असिस्टंट कमांडंट’ या पदासाठी भारती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या पदाच्या एकूण १३ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे ही भरती इंजिनिअर्स साठी आहे.

या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. उमेदवारांना या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. या भरतीसाठीची पात्रता, वयोमर्यादा, वेतन, अर्ज कसा करावा आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख याबाबतचे सविस्तर तपशील पुढीलप्रमाणे…

सशस्त्र सीमा बल भरती २०२३ मधील तपशील:

पदाचे नाव आणि पदसंख्या:

असिस्टंट कमांडंट – १३
एकूण रिक्त पदे – १३

शैक्षणिक पात्रता:

अर्ज करणारी व्यक्ती मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून टेलेकम्युनिकेशन किंवा इलेक्ट्रिकल कम्युनिकेशन मधून इंजिनीअरिंगची पदवी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. किंवा त्या उमेदवाराकडे समकक्ष पदवी असणे गरजेचे आहे. याशिवाय सविस्तर पात्रता वाचण्यासाठी खाली दिलेल्या अधिसूचनेच्या लिंकवर क्लिक करावे.

वयोमर्यादा:

कमाल ३५ वर्षे. अर्जदार जर आधीपासूनच केंद्र सरकारच्या सेवेत कार्यरत असेल तर कमाल वयोमार्यादेत ५ वर्षांची सूट आहे. याशिवाय ओबीसी प्रवर्गाला कमाल वयोमर्यादेत ३ वर्षांची तर एससी/एसटी प्रवर्गासाठी ५ वर्षांची सूट आहे.

(वाचा: MRVC Recruitment 2023: ‘मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन’ मध्ये भरती! जाणून घेऊया भरतीचे सर्व तपशील..)

वेतनश्रेणी: ५६ हजार १०० ते १ लाख ७७ हजार ५०० रुपये.

अर्जाची पद्धत: ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: १ ऑक्टोबर

या भरतीच्या अधिक माहितीसाठी ‘सशस्त्र सीमा बला’ची अधिकृत वेबसाईट: http://www.ssbrectt.gov.in

या भरती संदर्भातील सविस्तर अधिसूचना वाचण्यासाठी https://drive.google.com/file/d/1FToUCvKs4Cjgu4BWVLXhovMK5L09uRAB/view या लिंकवर क्लिक करावे.

अर्ज शुल्क: या भरतीसाठी खुल्या आणि ओबीसी प्रवर्गासाठी ४०० रुपये अर्ज शुल्क तर राखीव प्रवर्गाला शुल्क माफ आहे.

अर्ज कसा करावा: या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. अर्ज हे विहित वेळेच्या आधीच करायचे आहेत. अर्जामध्ये माहिती किंवा कोणतीही कागदपत्रे अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. अर्ज प्रक्रियेतून पात्र ठरलेल्या उमेदवारांची परीक्षा घेतली जाईल. परीक्षा आणि शारीरिक चाचणीच्या जोरावर अंतिम निवड करण्यात येईल.

(वाचा: Admission Last Date: दहावी-बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! पदविका अभ्यासक्रम प्रवेशाची अंतिम मुदत जाहीर..)

Source link

armed forces jobsCareer Newsgovernment jobsjob for engineersJob Newssashastra seema balSashastra Seema Bal job 2023sashastra seema bal recruitmentSashastra Seema Bal recruitment 2023ssb jobs
Comments (0)
Add Comment