महाराष्ट्र शासनाकडून ‘कृषी सेवक’ पदासाठी भरती जाहीर! २१०९ उमेदवारांना मिळणार रोजगार..

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागात महभरतीचे आयोजन केले आहे. त्यानुसार महाराष्ट्र कृषी सेवक भरतीला आता सुरुवात झाली आहे. राज्यातील विविध जिल्हयासाठी कृषी सेवकांची नियुक्ती केली जाणार असून १४ सप्टेंबर पासून अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे. या भरतीमध्ये सध्या राज्यातील पुणे, नागपूर, ठाणे, नाशिक,लातूर, औरंगाबाद या जिल्ह्यांचा समावेश असून त्यासाठीच्या एकूण २१०९ कृषीसेवकांची भरती केली जाणार आहे. तर उर्वरित जिल्हयांची यादी लवकरच जाहीर केली जाणार आहे.

राज्य शासनाच्या कृषी व पदुम विभागातील कृषी आयुक्तालयाच्या अंतर्गतभूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट- क संवर्गातील कृषी सहाय्यकांची भरपूर रिक्त भरण्यात येणार होती, अखेर त्याला वाट मोकळी झाली आहे. कृषी सेवक म्हणून निश्चित वेतनावर सरळसेवेने परीक्षेद्वारे आता जिल्ह्यात अनेक पदे भरण्यात येणार आहे. त्याची सुरुवात झाली असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

राज्य शासनाच्या कृषी सेवा भरतीचे तपशील पुढीलप्रमाणे….

पदाचे नाव आणि पदसंख्या:
राज्य कृषी सेवक – २१०९ जागा

कृषी सेवक पदाच्या २१०९ जागांची जिल्हानिहाय वर्गवारी:

ठाणे विभाग: कृषी सहसंचालक : २९४ रिक्त पदे

अमरावती विभाग: कृषी सेवक: २२७ रिक्त पदे

नागपुर विभाग: कृषी सहसंचालक: ४४८ रिक्त पदे

पुणे विभाग: कृषी सेवक: १८८ रिक्त पदे

नाशिक विभाग: कृषी सहसंचालक : ३३६ रिक्त पदे

औरंगाबाद विभाग: विभागीय कृषी सहसंचालक : १९६ रिक्त पदे

लातूर विभाग: कृषी सहसंचालक: १७० रिक्त पदे

कोल्हापूर विभाग: कृषी सहसंचालक: २५० रिक्त पदे

एकूण रिक्त पदे : २१०९

(वाचा: MRVC Recruitment 2023: ‘मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन’ मध्ये भरती! जाणून घेऊया भरतीचे सर्व तपशील..)

पात्रता: कृषी विषयात पदवीधर

वयोमर्यादा : किमान १९ ते कमाल ३८ वर्षे.

वेतन श्रेणी : १६ हजार

अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: १४ सप्टेंबर २०२३.

अर्ज करण्याची शेवटची तारीख: ३ ऑक्टोबर २०२३.

अर्ज करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ: www.krishi.maharashtra.gov.in

अर्ज शुल्क:
खुला प्रवर्ग – १ हजार
राखीव प्रवर्ग- ९०० रुपये
दिव्यांग/माजी सैनिक यांना शुल्क माफ आहे.

(वाचा: SSB Recruitment 2023: ‘सशस्त्र सीमा बल’मध्ये इंजिनीअर्स साठी भरती! जाणून घ्या कसा करायचा अर्ज..)

Source link

agriculture jobsCareer NewsGovernment jobJob Newskrushi sevak bharatikrushi sevak bharti 2023Krushi Sevak Recruitment 2023krushi sevak recruitment exammaharashtra government job
Comments (0)
Add Comment