iPhone 13 Mini होऊ शकतो बंद
कंपनीनं ह्याबाबत अधिकृत माहिती दिली नाही परंतु ब्लूमबर्गचे मार्क गुरमन ह्यांनी X प्लॅटफॉर्मवर सांगितलं आहे की iPhone 13 Mini चा स्टॉक कमी होत आहे. तसेच अमेरिकेत Apple च्या ऑनलाइन स्टोरवर iPhone 13 Mini च्या काही मॉडेल्ससाठी २-३ आठवड्यांचा अंदाजे डिलिव्हरी टाइम दाखवला जात आहे. तसेच इतर मॉडेल्ससाठी ६ ते ८ आठवड्यांचा वेळ लागत आहे.
हे देखील वाचा: …म्हणून चीनने घातली iPhone वर बंदी; अॅप्पलच्या अडचणीत वाढ
एका रिपोर्टनुसार, iPhone 13 Mini बंद होणार असल्यामुळे डिलिव्हरीला वेळ लागत असू शकतो. कंपनीनं कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही. परंतु गेल्यावर्षी iPhone 14 च्या लाँचनंतर, कंपनीनं iPhone 11 आणि iPhone 12 Mini बंद केले होते.
iPhone 13 सीरीजची माहिती
iPhone 13 लाइनअपमध्ये ४ फोन्स आले होते ज्यात iPhone 13, 13 Mini, 13 Pro आणि 13 Pro Max चा समावेश होता. हे फोन्स २०२१ मध्ये लाँच करण्यात आले होते. लाँचच्या वेळी iPhone 13 च्या १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ७९,९०० रुपये होती. तर, iPhone 13 Pro व्हेरिएंटची किंमत १,१९,९०० रुपये होती. iPhone 13 Pro Max ची किंमत १,२९,९०० रुपये होती. iPhone 13 Mini ची किंमत ६९,९०० रुपये ठेवण्यात आली होती.
हे देखील वाचा: आता हृदयाचे ठोके आणखी अचूक मोजणार Apple Watch; Series 9 आणि Watch Ultra चे फीचर्स लीक