ओप्पो ग्राहकांसाठी खुशखबर! चार वर्ष मोफत बदलता येणार फोनची खराब बॅटरी

Oppo युजर्ससाठी एक चांगली बातमी आली आहे. कंपनी आपल्या ग्राहकांसाठी फ्री बॅटरी रिप्लेसमेंट प्रोग्राम घेऊन येऊ शकते. टिपस्टर डिजिटल चॅट स्टेशननुसार, लवकरच कंपनी अशी घोषणा करू शकते. ह्या बॅटरी रिप्लेसमेंट प्रोग्राम अंतर्गत ४ वर्षे मोफत बॅटरी रिप्लेसमेंटची सुविधा देण्यात येईल. ही सुविधा आगामी OPPO A2 Pro 5G पासून ग्राहकांना दिली जाऊ शकते.

अजून WHYLAB नं दिलेल्या माहितीनुसार, बॅटरी हेल्थ चार वर्षांत ८० टक्क्यांपेक्षा कमी झाली तर अशी बॅटरी आफ्टर सेल्स सर्व्हिस अंतगर्त रिप्लेस करण्यास पात्र असेल, ही वॉरंटी इतर कंपन्यांच्या १ ते २ वर्षांच्या वॉरंटी पेक्षा कितीतरी जास्त आहे. हा प्रोग्राम चीनच्या बाहेर देखील लागू होईल की नाही हे सांगणं कठीण आहे. ओप्पोनं अद्याप ओप्पो ए२ प्रो बाबत कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही, परंतु समोर आलेल्या लीक रिपोर्ट्समधून बरीच माहिती समोर आली आहे.

वाचा: धक्कादायक बातमी! बंद होणार आहे iPhone चा हा लोकप्रिय मॉडेल, तुम्ही तर नाही ना वापरत

ओप्पो ए२ प्रो ५जी ची लीक माहिती

ओप्पो ए२ प्रो ५जी कर्व्ह एज असलेला ६.७-इंचाचा फुल एचडी+ ओएलईडी डिस्प्ले मिळेल. जो १२० हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि अंडर-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरला सपोर्ट करेल. फोनमध्ये डायमेंसीटी ७०५० प्रोसेसर, १२जीबी पर्यंत रॅम आणि ५१२जीबी पर्यंत स्टोरेज मिळू शकते. हा अँड्रॉइड १३ आधारित कलरओएस १३ वर चालेल.

६४ मेगापिक्सेल प्रायमरी कॅमेरा आणि २ मेगापिक्सेल मॅक्रो किंवा डेप्थ सेन्सर असेल. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलसाठी फोनमध्ये ८ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो. ह्यात ६७वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५०००एमएएचची बॅटरी असेल.

लीक किंमत

अपकमिंग ओप्पो ए२ प्रो ५जी चायना टेलीकॉमच्या प्रोडक्ट लायब्ररी डेटाबेसवर लिस्ट झाला आहे. लिस्टिंगनुसार, हा फोन ८जीबी रॅम व २५६जीबी स्टोरेजसह येऊ शकतो ज्याची किंमत २४ हजारांच्या असपास, १२जीबी रॅम व २५६जीबी स्टोरेज मॉडेल जवळपास २६ हजार रुपये आणि १२जीबी रॅम व ५१२जीबी स्टोरेज व्हेरिएंट जवळपास २८ हजार रुपयांमध्ये उपलब्ध होईल.

वाचा: मुकेश अंबानींना टक्कर देण्यासाठी येतोय इलॉन मस्क; Starlink ला लवकरच मिळू शकतो भारतात परवाना

ही लीक किंमत आहे त्यामुळे खरी किंमत वेगळी असू शकते. आगामी ए २ प्रो ५जी वेस्ट ब्लॅक, डेजर्ट ब्राउन आणि डस्क क्लाउड पर्पल सारख्या कलर्समध्ये उपलब्ध होईल. हा फोन सर्वप्रथम चीनमध्ये १५ सप्टेंबरला लाँच होईल. जागतिक बाजारातील उपलब्धतेबाबत अद्याप माहिती मिळाली नाही.

Source link

free battery replacement programoppooppo 4 year free battery replacement programoppo a2 proओप्पोओप्पो ए२ प्रो
Comments (0)
Add Comment