Vivo T2 Pro 5G लाँच टाइमलाइन
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर विवोनं नवीन टीजर व्हिडीओ शेयर करून स्मार्टफोनच्या लाँचची माहिती दिली आहे. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर देखील हा टीजर लिस्ट करण्यात आला आहे. टीजरमध्ये कमिंग सून लिहिण्यात आलं आहे, परंतु रिपोर्ट्सनुसार Vivo T2 Pro 5G स्मार्टफोन ह्याच महिन्यात सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात सादर होऊ शकतो.
वाचा: ओप्पो ग्राहकांसाठी खुशखबर! चार वर्ष मोफत बदलता येणार फोनची खराब बॅटरी
Vivo T2 Pro 5G ची डिजाइन
Vivo T2 Pro 5G फोनची डिजाइन पाहता टीजरमध्ये दिसत आहे की ह्यात कर्व एज अॅमोलेड डिस्प्ले मिळू शकतो. फोनमध्ये पंच होल स्क्रीन आणि उजवीकडे वॉल्यूम आणि पावर बटन दिसत आहे. परंतु कलरची माहिती समोर आली नाही परंतु कॉर्नर्स पाहून ह्यात गोल्डन फ्रेम दिली जाईल, हे स्पष्ट झालं आहे.
Vivo T2 Pro 5G चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स
Vivo T2 Pro 5G मध्ये ६.३८ इंचाचा ३डी कर्व अॅमोलेड डिस्प्ले मिळू शकतो. जो १२०हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि हाय रेजोल्यूशनला सपोर्ट करेल. लीकनुसार डिवाइसमध्ये MediaTek Dimensity 7200 चिपसेट मिळू शकतो. जोडीला ८जीबी रॅम व २५६जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेज मिळू शकते. त्याचबरोबर ८जीबी व्हर्च्युअल रॅमचा सपोर्टही दिला जाऊ शकतो.
वाचा: मुकेश अंबानींना टक्कर देण्यासाठी येतोय इलॉन मस्क; Starlink ला लवकरच मिळू शकतो भारतात परवाना
डिवाइसमध्ये ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायजेशनसह ड्युअल रियर कॅमेरा सेटअप असू शकतो, ज्यात ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा मिळेल. फोनमध्ये ५०००एमएएचची बॅटरी आणि सुपरवूक फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी मिळू शकते. ऑपरेटिंग सिस्टम पाहता मोबाइल अँड्रॉइड १३ वर आधारित असू शकतो. Vivo T2 Pro 5G मध्ये ड्युअल सिम 5G, ब्लूटूथ, वाय-फाय, फिंगरप्रिंट सेन्सर असे अनेक फीचर्स मिळू शकतात.