महिलांना छळायची शिकवण देताय का? चित्रा वाघ यांचा इंदुरीकरांना सवाल

हायलाइट्स:

  • पारनेरच्या तहसीलदारांची ऑडिओ क्लिप चर्चेत
  • भाजप नेत्या चित्रा वाघ यांचा इंदुरीकरांवर निशाणा
  • चित्रा वाघ यांचं ट्वीट चर्चेत

म. टा. प्रतिनिधी, अहमदनगरः मागील वर्षी पुत्रपाप्तीसंबंधी वादग्रस्त विधान केल्यानंतर न्यायालयीन प्रक्रियेत अडकलेले समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर (Indurikar Maharaj) यांची भाजपने उघड बाजू घेतली होती. असे असेल तरी आता मात्र भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी इंदुरीकरांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली आहे. ‘सत्तेतील बेलगाम घोड्यांना हत्ती म्हणत बळ देऊन महिलांना छळायची शिकवण देताय का?’ असा सावल वाघ यांनी इंदुरीकरांचे नाव न घेता केला आहे.

पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्या ऑडिओ क्लिपप्रकरणातून वाघ यांनी ही टीका केली आहे. लोकप्रतिनिधींच्या जाचाला कंटाळून देवरे यांनी आत्महत्या करण्याचा इशारा देणारी ऑडिओ क्लिप तयार केली होती. नंतर ती समाज माध्यमांतून व्हायरल झाली. लोकप्रतिनिधी म्हणजे पारनेरचे राष्ट्रवादीचे आमदार नीलेश लंके होय. देवरे यांनी त्यांचे नाव घेतले नसले तरी लंके यांनी स्वत: पुढे येऊन आरोप फेटाळले होते. या प्रकरणात सुरवातीपासून वाघ यांनी देवरे यांची बाजू लावून धरली आहे. महिला म्हणून त्यांना त्रास होता कामा नये, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.

राज्यातील मंदिरे कधी उघडणार?; आरोग्यमंत्र्यांनी दिलं उत्तर

याच दरम्यान लंके यांच्या पुढाकारातून सुरू असलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये इंदुरीकरांचेही कीर्तन झाले. कीर्तनातून त्यांनी आमदार लंके यांचे मोठे कौतूक केले. इंदुरीकर म्हणाले होते, ‘हत्ती गावात आला की त्याच्यावर कुत्री भुंकत असतात. परंतु हत्ती आपली चाल बदलत नाही तो ध्येयाकडे चालत राहतो. त्यामुळे लंके तुमच्यावर कोणी कुत्री भुंकत असली तर तुम्ही त्याकडे लक्ष ने देता तुमची यशाच्या दिशेने सुरू असलेली वाटचाल सोडू नका,’ असेही इंदुरीकर म्हणाले.

या अनुषगांने वाघ यांनी एक ट्वीट केले आहे, त्यांनी म्हटले आहे की, ‘राज्यातील भोळ्या भाबड्या भगिनी मन लाऊन ज्यांचं किर्तन ऐकतात त्या ह.भ.प नी एका महिलेचीचं प्रशासकीय तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी कडून होणाऱ्या त्रासाची तुलना ‘कुत्री भुंकतात’ अशी करणं अतिशय दुदैवी… या सत्तेतील बेलगाम घोड्यांना ‘हत्ती’ म्हणतं बळ देऊन महिलांना छळायची शिकवण देताय का?’ असे वाघ यांनी म्हटलं आहे.

अनिल देशमुखांच्या अडचणी वाढणार?; ईडीकडून दोन सहकाऱ्यांविरोधात आरोपपत्र दाखल

पुत्रप्राप्ती संबंधीच्या विधानामुळे वादात अडकल्यानंतर भाजपच्या अध्यात्निक आणि सांस्कृती आघाडी तसेच अन्य नेत्यांनीही इंदुरीकरांना उघड पाठिंबा दिला होता. त्यांच्या घरी जाऊन भेट घेऊन या लढ्यात आम्ही सोबत असल्याचे सांगितले होते. मधल्या काळात न्यायालयातून त्यांना दिलासा मिळाल्यानंतर मोठे सत्कारही झाले होते. याही पुढे जाऊन इंदुरीकर यांना भविष्यातील संगमनेर तालुक्यातील भाजपचे उमेदवार म्हणून पाहिले जात आहे. अशा परिस्थितीत वाघ यांनी घेतलेली ही भूमिका धाडसी मानली जात आहे. महिलांबद्दल बेधडक आणि भेदभाव करणारी विधाने करतात, म्हणून इंदुरीकर यांच्या यापूर्वीही विविध महिला संघटनांकडून टीका झालेली आहे.

Source link

Chitra WaghIndurikar Maharajjyoti devre audio clipइंदुरीकर महाराजांचे किर्तनचित्रा वाघ
Comments (0)
Add Comment