CBSE Board Exam 2024 ची नोंदणी अर्ज (Registration Form) जमा करण्याची अंतिम तारीख ११ ऑक्टोबर २०२३ आहे. मात्र, विद्यार्थ्यांना २००० रुपये विलंब शुल्का भरून १९ ऑक्टोबरपर्यंत फॉर्म भरता येणार आहे. सीबीएसईच्या नोटीसनुसार पाच विषयांसाठी १ हजार ५०० रुपये परीक्षा शुल्क आहे. एका अतिरिक्त विषयासाठी विद्यार्थ्यांना ३०० रुपये अधिक शुल्क द्यावे लागणार आहे.
(वाचा : CBSE: सीबीएसई बोर्डाने जाहीर केले दहावी-बारावी २०२४ परीक्षेचे वेळापत्रक, जाणून घ्या केव्हा असणार अंतिम परीक्षा)
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE बोर्डाच्या) सूचनेनुसार, जे विद्यार्थी पुनर्परीक्षा आणि कंपार्टमेंट परीक्षा देतील त्यांना ३०० रुपये शुल्क भरावे लागणार आहेत. शिवाय, प्रात्यक्षिक परीक्षेचे शुल्क प्रति विषय १०० रुपये ठेवण्यात आले आहे. खासगी विद्यार्थ्यांच्या बोर्डाच्या परीक्षा फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिलमध्ये घेतल्या जातील. शिवाय, दहावी आणि बारावीच्या CBSE बोर्ड परीक्षेच्या तारखेबाबतची अधिकृत माहिती आणि वेळापत्रक या आधीच प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार शैक्षणिक वर्ष २०२३-२४ च्या बोर्डाच्या परीक्षा १५ फेब्रुवारी २०२४ पासून सुरू होऊन १० एप्रिल रोजी संपतील.
(वाचा : CBSE Exams 2024: सीबीएसई बोर्डाच्या पेपर पॅटर्नमध्ये मोठा बदल; दहावी आणि बारावीच्या परीक्षांमधला हा मोठा बदल)
सीबीएसई बोर्डाच्या नियमित परीक्षा ५५ दिवसांत संपणार आहेत. जेईई मेन, एनईईटी यूजी आणि इतर परीक्षांच्या तारखा बोर्डाच्या परीक्षांच्या तारखांशी टक्कर होणार नाहीत याची खात्री करण्यासाठी बोर्डाने आणखी एक नोटीस जारी केली आहे. ज्यामध्ये असे म्हटले आहे की परीक्षा आयोजित करणार्या संस्थांनी सीबीएसई बोर्डाच्या तारखा लक्षात ठेवाव्यात आणि त्यानुसार तारखा घोषित कराव्यात, जेणेकरून परीक्षेच्या तारखांमध्ये संघर्ष होणार नाही.
सीबीएसई बोर्डाकडून दरवर्षी फेब्रुवारी ते एप्रिल या कालावधीत परीक्षा घेतल्या जातात. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निकाल अधिकृत वेबसाइटवर जाहीर केला जातो. यावर्षीही CBSE हा ट्रेंट कायम राहणार असल्याचे बोलले जात आहे.
(वाचा : CBSE Exam 2024: सीबीएसई बोर्डाच्या दहावी-बारावी परीक्षेसाठी सोडलेला नमुना पेपर,असे डाऊनलोड करा सँपल पेपर)