२०२२ मधील लोकप्रिय आयफोन्सची किंमत अॅप्पलनं १०,००० रुपयांनी कमी केली आहे. नवीन किंमत कंपनीच्या अधिकृत वेबसाइट Apple.in वर दिसत आहे. दोन्ही आयफोन तीन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये येतात आणि त्या सर्व व्हेरिएंटची किंमत कमी करण्यात आली आहे.
वाचा: Apple चं शक्तिप्रदर्शन! मजबूत टायटेनियम फ्रेमसह iPhone 15 Pro आणि iPhone 15 Max लाँच
iPhone 14 आणि iPhone 14 Plus ची नवीन किंमत
iPhone 14 जुनी किंमत | iPhone 14 नवीन किंमत |
१२८जीबी – ७९,९९९ रुपये | १२८जीबी – ६९,९०० रुपये |
२५६जीबी – ८९,९०० रुपये | २५६जीबी – ७९,९०० रुपये |
५१२जीबी – १,०९,९०० रुपये | ५१२जीबी – ९९,९०० रुपये |
iPhone 14 Plus ची जुनी किंमत | iPhone 14 Plus ची नवीन किंमत |
१२८जीबी – ८९,९०० रुपये | १२८जीबी – ७९,९०० रुपये |
२५६जीबी – ९९,९०० रुपये | २५६जीबी – ८९,९०० रुपये |
५१२जीबी – १,१९,९०० रुपये | ५१२जीबी – १,०९,९०० रुपये |
Apple iPhone 14, iPhone 14 Plus चे स्पेसिफिकेशन्स
अॅप्पल iPhone 14 आणि iPhone 14 Plus मध्ये अनुक्रमे ६.१ इंच आणि ६.७ इंचाची स्क्रीन आहे. ह्या मॉडेल्समध्ये एनहान्स बॅटरी लाइफ मिळते असं कंपनीनं सांगितलं आहे. आयफोन १४ मध्ये आणि आयफोन १४ प्लसमध्ये क्रॅश डिटेक्शन आणि सुधारित एक्सलेरोमीटर आणि जायरोमीटर सेन्सर देण्यात आला आहे.
वाचा: iPhone 15 आणि iPhone 15 Plus लाँच, इथे जाणून घ्या ह्या Apple फोन्सची संपूर्ण माहिती
दोन्ही iPhone 14 आणि iPhone 14 Plus मध्ये १२ मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा मिळतो, जो आयफोन १३ च्या तुलनेत वेगवान अपर्चरला सपोर्ट करतो. कंपनीनं दावा केला आहे की iPhone 14 ची लो लाइट परफॉर्मन्स जुन्या मॉडेल्सच्या तुलनेत ४९% जास्त चांगली आहे. त्याचबरोबर आयफोन १४ आणि आयफोन १४ प्लसमध्ये १२ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच अॅप्पल पहिल्यांदाच ह्या स्मार्टफोन्समध्ये ऑटोफोकस सपोर्टसह १२ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे.