ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप आपली नोंदणी अर्ज सबमिट केलेली नाही ते ODL आणि ऑनलाइन प्रोग्रामसाठी जुलै २०२३ च्या सत्रासाठी नवीन प्रवेश आणि पुनर्नोंदणी प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी IGNOU च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ अर्ज करू शकतात. शिवाय विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन विद्यार्थी शुल्क आणि इतर माहिती तपासू शकतात.
सध्या इग्नूमध्ये जुलै सत्रासाठी इतर अनेक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश सुरू आहेत. ज्या उमेदवारांना अर्ज करायचा आहे ते अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याच्या पद्धतीविषयी अधिक माहिती अधिकृत वेबसाइटवर दिली आहे.
(वाचा : Career In Paint Technology: पेंट टेक्नॉलॉजीच्या रंगीत विश्वात करिअरच्या अनेक संधी; पगारही उत्तम)
नोंदणीसाठी ही कागदपत्रे आवश्यक :
- छायाचित्र
- स्वाक्षरी
- संबंधित शैक्षणिक पात्रता
- अनुभव प्रमाणपत्र
- SC/ST/OBC असल्यास श्रेणी प्रमाणपत्र
असा करा अर्ज :
पायरी 1: सर्वप्रथम इग्नूच्या अधिकृत वेबसाइटवर जा.
पायरी 2: IGNOU 2023 जुलै सत्र नोंदणी/पुन्हा नोंदणी लिंकवर क्लिक करा.
पायरी 3: दिलेल्या लिंकमध्ये आवश्यक तपशील प्रविष्ट करा.
पायरी 4: आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
पायरी 5: अर्ज फी सबमिट करा आणि अंतिम सबमिशन लिंकवर क्लिक करा.
IGNOU (इग्नू) म्हणजे काय?
IGNOU (Indira Gandhi National Open University) हे मुक्त शिक्षण विद्यापीठ आहे. दूरस्थ शिक्षणासाठी हे जगातील सर्वात मोठे विद्यापीठ मानले जाते. ज्यांना नियमित अभ्यास करता येत नाही त्यांनाही आपली पदवी पूर्ण करता यावी यासाठी हे लक्षात घेऊन ही स्थापना करण्यात आली. IGNOU यूजी, पीजी, पीएचडी आणि इतर डिप्लोमा कोर्स चालवतात ज्यामध्ये दरवर्षी मोठ्या संख्येने विद्यार्थी प्रवेश घेतात.
(वाचा : CBSE Exams 2024: २०२४च्या बोर्डाच्या परीक्षांसाठी अर्ज नोंदणीला सुरुवात; या विद्यार्थ्यांना भरता येणार ऑनलाइन अर्ज)