एमपीएससी अंतर्गत वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागात ४१ पदांची भरती! आजच करा अर्ज..

तुम्ही वैद्यकीय शिक्षण घेतले असेल आणि राज्य शासनाच्या सेवेत काम करण्याची संधी शोधात असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. एमपीएससी अंतर्गत म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे राज्यच्या वैद्यकीय विभागातील महत्वाच्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या भरती प्रक्रिये अंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाशी संलग्न शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विविध विषयांतील सहायक प्राध्यापक पदांची भरती होणार आहे.

वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-ब या संवर्गाखाली हि भरती होणार असून एकूण ४१ रिक्त जागा भरण्यात येणार आहे.या पदांसाठी इच्छूक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून ३ ऑक्टोबर हि अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

या पदांसाठीची पात्रता, पदांचे वर्गीकरण, वेतन आणि इतर माहिती पुढीलप्रमाणे…

वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-ब या संवर्गातील पदांचे नाव आणि पद संख्या:

पदाचे नाव : सहाय्यक प्राध्यापक
विभाग आणि पदसंख्या:
मूत्रविकारशास्त्र (Urology) – ८
वृक्कविकारशास्त्र (Nephrology) – ५
बालरोग शल्यचिकित्साशास्त्र (Paediatric Surgery) – २
नवजात शिशुरोगशास्त्र (Neonatology) – ५
जठरांत्रजन्यरोगशास्त्र (Gastroentrology) – ४
मज्जातंतूचिकित्साशास्त्र (Neurology) – १
अंतःस्त्रावशास्त्र (Endocrinology) – १
हृदयशास्त्र (Cardiology) – ९
हृदयवाहिका उरोविकृती शल्यचिकित्साशास्त्र (Cardio-Vascular and Thoracic Surgery) – ६
एकूण रिक्त जागा – ४१

(वाचा: Nashik Mahanagar Palika Bharti 2023: नाशिक महानगरपालिकेत पशुसंवर्धन विभागात भरती! जाणून घ्या कसा करायचा अर्ज..)

शैक्षणिक पात्रता – प्रत्येक पदाच्या पात्रतेचे निकष वेगळे असून त्याची सविस्तर माहिती अधिसूचनेत नमूद केली आहे. अधिसूचनेची लिंक खाली दिलेली आहे.

नोकरी ठिकाण – महाराष्ट्र

अर्ज शुल्क – अराखीव/ खुला प्रवर्ग यांस ३९४ रुपये आणि मागासवर्गीय / आर्थिक दुर्बल घटक / अनाथ / दिव्यांग प्रवर्गास २९४ रुपये.

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज सुरू होण्याची तारीख – १३ सप्टेंबर २०२३

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३ ऑक्टोबर २०२३

अधिकृत वेबसाईट – mpsc.gov.in

सविस्तर अधिसूचना वाचण्यासाठी https://drive.google.com/file/d/1FVoM0b8FV0tbtSZswhNfz3cBAfNafzid/view या लिंकवर क्लिक करा.

वेतनश्रेणी – ५७ हजार ७०० रुपये ते १ लाख ८२ हजार रुपये.

वरील भरतीकरिताअर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करताना सर्व माहिती काळजी पूर्वक वाचा, अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. उमेदवारांची निवड ही सर्व पात्रतेची छाननी करून चाळणी परीक्षे द्वारे केली जाईल. त्यानंतर मुलाखतीची फेरी पार पडून अंतिम निवड केली जाईल.

(वाचा: ASRB Recruitment 2023: ‘कृषी वैज्ञानिक भरती मंडळ’ मध्ये ३६८ पदांची भरती! जाणून घ्या नोकरीचे सविस्तर तपशील..)

Source link

assistant professor jobsCareer NewsGovernment jobJob Newsjobs in medical fieldMedical Education and Research Service recruitmentmedical field jobsmpsc examMPSC Recruitment 2023
Comments (0)
Add Comment