१२ हजारांच्या आत नवा 5G Phone लाँच; Poco M6 Pro 5G चा नवा व्हेरिएंट भारतीय बाजारात दाखल

Pocoनं भारतात Poco M6 Pro 5G चा नवा रॅम आणि स्टोरेज व्हेरिएंट सादर केला आहे. हा फोन गेल्या महिन्यात लॉन्‍च करण्यात आला होता आणि कंपनीनं ४जीबी रॅम व ६४जीबी स्टोरेज आणि ६जीबी रॅम व १२८जीबी स्टोरेज व्हेरिएंट लॉन्‍च केले होते. ह्यात आता नवा स्टोरेज ऑप्‍शन जोडण्यात आला आहे, जो १४ सप्टेंबरपासून Flipkart वरून विकला जाईल.

Poco M6 Pro 5G च्या नव्या व्हेरिएंटची किंमत आणि उपलब्धता

Poco M6 Pro 5G चा नवीन व्हेरिएंट ४जीबी रॅम आणि १२८GB स्टोरेजसह येतो, ज्याची किंमत ११९९९ रुपये आहे. हा फोन पावर ब्लॅक आणि फॉरेस्ट ग्रीन कलर ऑप्शन्समध्ये येतो. तसेच एम६ प्रो ५जीचा ४जीबी रॅम व ६४जीबी स्‍टोरेज व्हेरिएंट १०,९९९ रुपये आणि ६जीबी रॅम व १२८जीबी स्‍टोरेज व्हेरिएंट १२९९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे.

वाचा: सिंगल चार्जमध्ये १७ तास चालेल हा लॅपटॉप; Tecno Megabook T1 ची भारतात एंट्री

Poco M6 Pro 5G चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

Poco M6 Pro 5G मध्ये ६.७९ इंचाचा फुल-एचडी+ डिस्प्ले आहे. जो ९० हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि २४० हर्ट्झ टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. हा डिस्प्ले गोरिल्ला ग्लास ३ नं प्रोटेक्‍ट करण्यात आला आहे. फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ४ जेन २ प्रोसेसरसह अधिकतम ६जीबी रॅम देण्यात आला आहे. हा स्‍मार्टफोन अँड्रॉइड १३ वर आधारित MIUI १४ वर चालतो.

वाचा: iPhone 15 दुबईत ४६ हजार रुपयांनी स्वस्त! मग Make in India चा फायदा काय? नेटीजन्सचा सवाल

Poco M6 Pro 5G मध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप मिळतो. फोनमध्ये ५० मेगापिक्सलचा एआय सेन्सर आणि २ मेगापिक्सलचा डेप्‍थ सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलसाठी ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. Poco M6 Pro 5G मध्ये १८वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५,०००एमएएच ची बॅटरी आहे. हा स्‍मार्टफोन आयपी५३ रेटिंगसह येतो. फोनमध्ये एक साइड माउंटेड फ‍िंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे.

Source link

pocopoco m6 pro 5gpoco m6 pro 5g 128gbpoco m6 pro 5g flipkartpoco m6 pro 5g price
Comments (0)
Add Comment