Redmi Note 13 सीरीज लाँच डेट आणि डिजाइन
टीजर पोस्टरनुसार Redmi Note 13 सीरीज फोन्स चीनमध्ये २१ सप्टेंबरला लाँच केली जाईल. ह्या सीरिजचे Redmi Note 13, Note 13 Pro आणि Note 13 Pro+ डिवाइस चीनमध्ये स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी ७:०० वाजता लाँच केले जातील.
वाचा: आणखी एक स्वदेशी ५जी फोन येतोय बाजारात; Lava Blaze Pro 5G भारतात लवकरच होईल लाँच
इमेजमध्ये रेडमी नोट 13 प्रो आणि नॉट 13 प्रो प्लसची झलक दिसत आहे. त्यानुसार, सीरीजचा प्रो प्लस मॉडेल कर्व एज स्क्रीनसह येईल, तर प्रो मॉडेलमध्ये फ्लॅट डिस्प्ले मिळू शकतो. प्रो प्लसच्या मागे लेदर बॅग आणि उभार असलेला कॅमेरा रिंग दिसत आहे. प्रो डिवाइसच्या मागे ग्लास बॅक पॅनल आणि उभार असलेला कॅमेरा रिंग दिसत आहे. दोन्ही प्रो मॉडेलमध्ये २०० मेगापिक्सलचा कॅमेरा मिळेल.
रेडमी नोट 13 सीरीजचे संभाव्य स्पेसिफिकेशन्स
रेडमी नोट 13 सीरीजच्या स्मार्टफोन्समध्ये ६.६७ इंचाचा १.५के ओएलईडी डिस्प्ले मिळण्याची शक्यता आहे. जो १२०हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि २७१२×१२२० पिक्सल रिजॉल्यूशनला सपोर्ट करेल. नोट 13 आणि प्रो मध्ये ५१२०एमएएच बॅटरीसह ६७वॉट फास्ट चार्जिंग आणि नोट 13 प्रो प्लस मध्ये १२०वॉट फास्ट चार्जिंग मिळेल, अशी माहिती लिक्समधून समोर आली आहे.
रेडमी नोट 13 सीरीजच्या टॉप मॉडेलमध्ये कंपनी डायमेंसीटी ७२००-अल्ट्राचा वापर करणार आहे. तर नोट 13 प्रो मध्ये स्नॅपड्रॅगन ७ जेन १ चिपसेटचा वापर केला जाऊ शकतो. जोडीला १६जीबी पर्यंत रॅम आणि १टीबी पर्यंतची स्टोरेज दिली जाऊ शकते.
वाचा: १२ हजारांच्या आत नवा 5G Phone लाँच; Poco M6 Pro 5G चा नवा व्हेरिएंट भारतीय बाजारात दाखल
रेडमी नोट 13 सीरीज फोन्समध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. ज्यात प्रो मॉडेलमध्ये २०० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड आणि २ मेगापिक्सलचा थर्ड सेन्सर मिळेल. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी १६ मेगापिक्सलचा फ्रंट दिला जाऊ शकतो.