दादरा-नगर हवेली आणि दमण मध्ये शिक्षक आणि लेखापाल पदासाठी भरती! जाणून घ्या सर्व तपशील

तुम्ही शिक्षक आणि लेखापाल पदांच्या नोकरीच्या शोधात असाल आणि दादरा -नगर हवेली आणि दमण दिव भागात नोकरीसाठी इच्छुक असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे शिक्षण संचालनालय यांच्या वतीने समग्र शिक्षा अभियाना अंतर्गत दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव यांच्या यूटी प्रशासन द्वारे ‘अर्धवेळ शिक्षक आणि लेखापाल’ पदांच्या एकूण २ रिक्त जागांसाठी भरती सुरू आहे.

या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून २६ सप्टेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. या भरतीसाठीची पात्रता, वेतन आणि इतर तपशील पुढीलप्रमाणे….

पदाचे नाव आणि पदसंख्या:

अर्धवेळ शिक्षक – १
लेखापाल – २
एकूण पदसंख्या – २

(वाचा: Nashik Mahanagar Palika Bharti 2023: नाशिक महानगरपालिकेत पशुसंवर्धन विभागात भरती! जाणून घ्या कसा करायचा अर्ज..)

शैक्षणिक पात्रता:

अर्धवेळ शिक्षक – संबंधित विषयात कला शाखेतून पदवी परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. तसेच दोन वर्षांचा एलेमेंटरी डिप्लोमा आवश्यक आहे.

लेखापाल – फर्स्ट क्लास श्रेणीसह अकाऊंट विषय घेऊन कॉमर्स पदवी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.

(या व्यतिरिक्त पात्रतेचे निकष वाचण्यासाठी सविस्तर अधिसूचना वाचावी. अधिसूचना वाचण्यासाठी खाली लिंक दिलेली आहे.)

वयोमर्यादा: कमाल ३० वर्षे

अर्ज पद्धती: ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता: शिक्षण विभाग, समग्र शिक्षा कक्ष ३१२,, तिसरा मजला, लेख भवन, आमली सिल्वासा, दादरा आणि नगर हवेली जिल्हा, दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव, पिन कोड ३९६२३०.

अर्ज करण्याची शेवटची तारीख: २६ सप्टेंबर २०२३

अधिकृत वेबसाईट: https://www.daman.nic.in/

वेतनश्रेणी:
अर्धवेळ शिक्षक – १२ हजार रुपये
लेखापाल – २० हजार रुपये.

या भरती संदर्भात सविस्तर अधिसूचना वाचण्यासाठी https://drive.google.com/file/d/19NRzrfpJTLQ7B7kz5KI04FG6iPTgDZGw/view या लिंक वर क्लिक करावे.

अर्ज कसा करावा: सदर भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. ऑफलाईन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी अधिसूचना काळजीपूर्वक वाचावे. अर्ज अधिसूचनेतील पत्त्यावर विहित वेळेत म्हणजे २६ सप्टेंबर आधी पाठवावा. त्या तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.

(वाचा: ASRB Recruitment 2023: ‘कृषी वैज्ञानिक भरती मंडळ’ मध्ये ३६८ पदांची भरती! जाणून घ्या नोकरीचे सविस्तर तपशील..)

Source link

Career NewsCareer News In MarathiDNHDD jobsgovernment jobsjob for accountantjob for teachersJob NewsKGBV Recruitment 2023
Comments (0)
Add Comment