पहिल्या रविवारी ८० कोटींहून अधिक कमाई करणारा हा पहिला बॉलिवूड चित्रपट ठरला. मात्र सोमवारपासून चित्रपटाच्या कमाईत झपाट्याने घट होत आहे. त्यामुळे बुधवारच्या कमाईचे आकडे निर्मात्यांना अडचणीत आणू शकतात.
Sacnilk वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, शाहरुख खान विजय सेतुपती यांच्या ‘जवान’ ची बुधवारी सर्वात कमी कमाई झाली. या चित्रपटाने ७व्या दिवशी म्हणजेच पहिल्या बुधवारी २३.३ कोटींची कमाई केली आहे. किंग खानच्याच ‘पठाण’ने पहिल्या बुधवारी जितकी कमाई केली होती तितकीच कमाईही जवाननेही केली आहे. पण, ‘गदर २’ ने पहिल्या बुधवारी सुमारे १० कोटी रुपये अधिक म्हणजेच ३२.३७ कोटी रुपयांची कमाई केली होती.
देशभरातून ३६८.३८ कोटी रुपये कमावले
बुधवारी जवानने हिंदीमध्ये २१.५ कोटी रुपये, तामिळमध्ये ९५ लाख रुपये आणि तेलुगूमध्ये ८५ लाख रुपये कमावले आहेत. बुधवारी या चित्रपटाने २६ कोटींची कमाई केली. या ७ दिवसांत ‘जवान’ने देशभरात एकूण ३६८.३८ कोटी रुपयांची कमाई केली असून, त्यापैकी ३२८.०८ कोटी रुपयांची कमाई फक्त हिंदीमध्ये झाली आहे.
‘जवान’ची जगभरातील कमाई जबरदस्त
रेड चिलीज एंटरटेनमेंट निर्मित ‘जवान’च्या जगभरातील कमाईबद्दल सांगायचे तर, या चित्रपटाने आतापर्यंत ६५५ कोटींहून अधिक कमाई केली आहे. चित्रपटाने ६ दिवसांत जगभरात ६२१ कोटी रुपये कमावले आहेत तर देशभरात एकूण ४१५.०० कोटी रुपये कमावले.
‘जवान’ पाहून सेलिब्रेटीही खुश
शाहरुख खानचा ‘जवान’ ७ सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला, या सिनेमाचे जगभरातून सर्वसामान्य लोकांसोबतच सेलिब्रेटीही कौतुक करत आहेत. चित्रपट पाहिल्यानंतर आर.आर. राजामौली, महेश बाबूपर्यंत, अक्षय कुमार ते सलमान खानपर्यंत सर्वांनी सोशल मीडियावर पोस्ट करून चित्रपटाचे कौतुक केले आहे. या चित्रपटात शाहरुख खान दुहेरी भूमिकेत दिसत आहे. चित्रपटाची कथा भावूक करणारी असल्यामुळे लोकांची चांगलीच पसंती मिळत आहे.
३०० कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने ६५० कोटींचा आकडा पार केला
जवळपास ३०० कोटींच्या बजेटमध्ये जवान बनल्याचे बोलले जाते. हा चित्रपट जवळपास ५५०० स्क्रीनवर दाखवला जात आहे. केवळ भारतीय बॉक्स ऑफिसवरच या चित्रपटाने त्याच्या खर्चापेक्षा जास्त रक्कम वसूल केली आहे. जगभरात या चित्रपटाने आपल्या बजेटच्या दुप्पट कमाई केली आहे.