सोलापूर जिल्हा परिषद आरोग्य विभागात विविध पदांसाठी भरती! जाणून घ्या भरतीचे तपशील..

शासकीय सेवेत आरोग्य विभागात काम करण्याची इच्छा असेल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत सोलापूर जिल्हा परिषद, आरोग्य विभाग यांच्या वतीने काही महत्वाच्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या भरती प्रक्रिये अंतर्गत जिल्हयांतर्गत जिल्हास्तर, तालुकास्तर, उपजिल्हा रुग्णालयस्तर, ग्रामीण रुग्णालयस्तर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर विविध १४ संवर्गातील पदे भरण्यात येणार आहे.

या भरतीमध्ये एकूण ५२ रिक्त पदे समाविष्ट असून ती कंत्राटी स्वरुपाची आणि करार तत्वावरील व एकत्रित मानधनावरील आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले असून २७ सप्टेंबर २०२३ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. या पदांसाठीची पात्रता, वेतन आणि इतर तपशील पुढीलप्रमाणे…

पदाचे नाव आणि पदसंख्या:

सुपर स्पेशालिस्ट – १
स्पेशालिस्ट – ७
वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस – २४
दंतवैद्य – १
वैद्यकीय अधिकारी आयुष – १
वैद्यकीय अधिकारी आरबीएसके – ३
ऑडिओलॉजिस्ट – २
फिजिओथेरपिस्ट – २
तंत्रज्ञ – ३
श्रवण प्रशिक्षक – १
कार्यक्रम व्यवस्थापक सार्वजनिक आरोग्य – ४
तालुका गट व्यवस्थापक – १
आशा समूह प्रवर्तक – २
एकूण रिक्त जागा – ५२

(वाचा: DNHDD KGBV Recruitment 2023: दादरा-नगर हवेली आणि दमण मध्ये शिक्षक आणि लेखापाल पदासाठी भरती! जाणून घ्या सर्व तपशील)

शैक्षणिक पात्रता:

शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार असून त्यासाठी सविस्तर अधिसूचना पहावी. अधिसूचनेची लिंक खाली दिलेली आहे.

वेतनश्रेणी:

सुपर स्पेशालिस्ट- १ लाख २५ हजार
स्पेशालिस्ट – ७५ हजार
वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस – ६० हजार
दंतवैद्य – ३० हजार
वैद्यकीय अधिकारी आयुष – २८ हजार
वैद्यकीय अधिकारी आरबीएसके – २८ हजार
ऑडिओलॉजिस्ट – २५ हजार
फिजिओथेरपिस्ट – २० हजार
तंत्रज्ञ – १७ हजार
श्रवण प्रशिक्षक – २५ हजार
कार्यक्रम व्यवस्थापक सार्वजनिक आरोग्य – ३५ हजार
तालुका गट व्यवस्थापक – १८ हजार
आशा समूह प्रवर्तक – ८ हजार ७२५

निवड प्रक्रिया: मुलाखत

नोकरी ठिकाण: सोलापूर

अर्ज शुल्क: अराखीव प्रवर्गातील उमेदवारांकरिता १५० रुपये अर्ज शुल्क तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना १०० रुपये अर्ज शुल्क आहे.

अर्ज पद्धती: ऑफलाइन

अर्ज करण्याचा पत्ता: जिल्हा कार्यक्रम व्यवस्थाप राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, सोलापुर

अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: १८ सप्टेंबर २०२३

अर्ज करण्याची शेवटची तारीख: २७ सप्टेंबर २०२३

या भरतीसाठीची अधिकृत वेबसाईट: zpsolapur.gov.in

या भरतीचे सविस्तर तपशील (अधिसूचना) जाणून घेण्यासाठी https://drive.google.com/file/d/1WNYF6x7m0dK3V3VZH9c8_VrMrGwNFlt5/view या लिंकवर क्लिक करा.

(वाचा: Nashik Mahanagar Palika Bharti 2023: नाशिक महानगरपालिकेत पशुसंवर्धन विभागात भरती! जाणून घ्या कसा करायचा अर्ज..)

Source link

Career NewsCareer News In Marathidoctors recruitmentGovernment jobJob Newsmedical officer jobsSolapur Recruitment 2023solapur zp jobsolapur zp recruitment 2023zilla parishad medical job
Comments (0)
Add Comment