महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी फॉर्म नंबर १७ भरून परीक्षा देणाऱ्या खासगी विद्यार्थ्यांना ऑनलाइन नावनोंदणी अर्ज करण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. आता ३० स्पटेंबर ही अर्ज करण्याची अंतिम तारीख असेल. इच्छुक विद्यार्थी २० ते ३० सप्टेंबर दरम्यान अर्ज करू शकतात.
दहावी-बारावीच्या फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी खासगी विद्यार्थी म्हणून बसणार्या विद्यार्थ्यांना फॉर्म नंबर १७ द्वारे नावनोंदणी करण्यासाठी म्हणजे ऑनलाइन अर्ज करण्यासाठी नियमित शुल्क आकारून ११ सप्टेंबर पर्यंत मुदत दिली होती. परंतु आता ही मुदत वाढवली आहे. अद्यापही अनेक विद्यार्थ्यांची अर्ज करण्याची प्रक्रिया बाकी असल्याने शिक्षण मंडळाने मुदत वाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांना नियमित शुल्कानेच अर्ज भरण्यात येणार आहे, दिरंगाईचा कोणताही वाढीव शुल्क विद्यार्थ्यांना भरावा लागणार नाही.
(वाचा: Nashik Mahanagar Palika Bharti 2023: नाशिक महानगरपालिकेत पशुसंवर्धन विभागात भरती! जाणून घ्या कसा करायचा अर्ज..)
विद्यार्थ्यांनी अर्ज कसा करावा:
- विद्यार्थ्यांनी अर्ज करताना काही महत्वाची कागदपत्रे आपलोड करणे गरजेचे आहे. ऑनलाइन अर्ज भरताना शाळा सोडल्याच्या दाखल्याची मुळ प्रत, आधारकार्ड, स्वत:चा पासपोर्ट आकारातील फोटो हे स्कॅन करून अपलोड करावे. तसेच मोबाईल क्रमांक आणि ई-मेल देखील नमूद करणे अनिवार्य आहे.
- अर्ज भरून झाल्यावर भरलेल्या अर्जाची प्रत विद्यार्थ्यांना अर्जात नमूद केलेल्या ई-मेलवर प्राप्त होते. संपूर्ण भरलेल्या अर्जाची प्रिंटआऊट, शुल्काची पावती आणि हमीपत्र यांच्या दोन छाया प्रती विद्यार्थ्यांनी सोबत ठेवाव्या.
- अर्जदार विद्यार्थ्यांनी मुळ अर्ज, ऑनलाइन नाव नोंदणी शुल्क जमा केल्याबाबत पोचपावतीच्या दोन छायाप्रती व मूळ कागदपत्रे अर्जावर नमूद केलेल्या माध्यमिक शाळेत/कनिष्ठ महाविद्यालयात २२ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर या कलावधीत जमा कराव्या.
- माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचे अर्ज, ऑनलाइन नाव नोंदणी शुल्क जमा केल्याबाबत पोचपावतीची एक छायाप्रत, मूळ कागदपत्रे व यादी विभागीय मंडळाकडे ५ ऑक्टोबरपर्यंत जमा करावे.
फॉर्म नंबर १७ द्वारे दहावी आणि बारावी करिता अर्ज भरण्यासाठी संकेतस्थळ:
दहावीसाठी : http://form17.mh-ssc.ac.in
बारावीसाठी : http://form17.mh-hsc.ac.in
(वाचा: NHM Solapur Recruitment 2023: सोलापूर जिल्हा परिषद आरोग्य विभागात विविध पदांसाठी भरती! जाणून घ्या भरतीचे तपशील..)