आयफोन १५ ला टक्कर देणारा अँड्रॉइड फोन हवा? दणकट Xiaomi 14 Pro ची लाँच टाइमलाइन लीक

शाओमी आपल्या नवीन Xiaomi 14 फ्लॅगशिप सीरीजवर काम करत आहे, जी आयफोन १५ सीरिजला टक्कर देऊ शकते. ह्यात Xiaomi 14 आणि Xiaomi 14 Pro डिवाइसचा समावेश केला जाऊ शकतो. कंपनीनं अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही, परंतु मीडिया रिपोर्ट्समधून ह्या मोबाइल्सची लाँच टाइमलाइन आणि स्पेसिफिकेशन समोर आले आहेत. चला जाणून घेऊया कधी येणार हे फोन आणि त्यांचे लीक स्पेक्स.

Xiaomi 14 आणि Xiaomi 14 Pro ची लाँच टाइमलाइन

Xiaomiui च्या रिपोर्टनुसार, शाओमी नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात Xiaomi 14 आणि Xiaomi 14 Pro सादर करू शकते. दोन्ही डिवाइस सर्वप्रथम चीनमध्ये सादर केले जातील नंतर अन्य मार्केटमध्ये येतील. रिपोर्ट्सनुसार ह्या फ्लॅगशिप मोबाइल्ससाठी कंपनी मीयुआय १५ वर काम करत आहे जो अँड्रॉइड १४ वर आधारित असेल. एका टिपस्टरनुसार दोन्ही फोन्सची निर्मिती देखील सुरु झाली आहे.

वाचा: २०० मेगापिक्सलच्या जबरदस्त कॅमेऱ्यासह Honor 90 5G भारतात लाँच; जाणून घ्या किंमत

Xiaomi 14 आणि Xiaomi 14 Pro चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स

Xiaomi 14 आणि १४ Pro मध्ये ६.७३ इंचाचा कर्व अ‍ॅमोलेड डिस्प्ले दिला जाऊ शकतो. ज्यात हाय रिजॉल्यूशनसह १२० हर्ट्झ रिफ्रेश रेट दिला जाऊ शकतो. डिवाइस लेटेस्ट अँड्रॉइड १४ आधारित मीयुआय १५ वर चालतील. दोन्ही मध्ये ड्युअल सिम ५जी, ब्लूटूथ, वायफाय, इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर सारखे ऑप्शन मिळू शकतात.

ह्या दोन्ही डिवाइसमध्ये कंपनी क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८ जेन ३ चिपसेटचा वापर करू शकते. जो ऑक्टोबरमध्ये लाँच होईल आणि क्वॉलकॉमचा आतापर्यंतचा सर्वात शक्तिशाली प्रोसेसर असेल. फोन्समध्ये १२जीबी रॅम आणि २५६जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेज मिळू शकतो.

Xiaomi 14 Pro आणि Xiaomi 14 मध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळू शकतो. ज्यात लाइका ब्रॅंडिंगसह ५० मेगापिक्सलचा सोनी आयएमएक्स९८९ प्रायमरी सेन्सर, ५० मेगापिक्सलचा टेलीफोटो कॅमेरा आणि ५० मेगापिक्सलचा वाइड अँगल कॅमेरा मिळू शकतो.

वाचा: एकच नंबर! आला पाण्यात वापरता येणारा सर्वात पातळ फोन; Motorola Edge 40 Neo झाला लाँच

Xiaomi 14 मध्ये ४८६०एमएएचची बॅटरी आणि ९०वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी मिळू शकते. तर प्रो मॉडेलमध्ये ५०००एमएएचची बॅटरी आणि १२०वॉट फास्ट चार्जिंगचा समावेश केला जाऊ शकतो. दोन्ही फोन्समध्ये ५० वॉट वायरलेस चार्जिंग सपोर्ट मिळू शकतो, असं देखील सांगण्यात आलं आहे.

Source link

xiaomi 14 launchxiaomi 14 pro cameraxiaomi 14 pro launchxiaomi 14 seriesxiaomi 14 series launchxiaomi 14 series launch timeslineशाओमीशाओमी १४ सीरिज
Comments (0)
Add Comment